सोयाबीन फुल अवस्थेत 12-61-00 विद्राव्य खत वापरायला चालते का? पाहा..
वायरल फार्मिंग : शेतकरी मित्रांनो सोयाबीन दुसरी फवारणी अनेक शेतकरी फुल अवस्थेत करतात परंतु ढगाळ वातावरण किंव्हा पाऊस असल्यामुळे दुसरी फवारणी योग्य वेळेवर करणे शक्य होत नाही. अनेक वेळा सोयाबीन पिकात 50 टक्के पेक्षाही जास्त फुलधारणा झाल्यावर शेतकरी दुसरी फवारणी करतात. सोयाबीन भर फुल अवस्थेत 12-61-00 विद्राव्य खत चालते का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर माहिती शेवट पर्यंत वाचा.
शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेती विषयक माहिती व हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.
• सर्व प्रथम 12-61-00 विद्राव्य खत आहे काय?
शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या 12-61-00 हे 100 टक्के पाण्यात विरघळणारे एक विद्राव्य खत आहे, सोयाबीन पिकात फुटवे वाढवण्यासाठी (Soyabean Futve) तसेच सोयाबीन पिकातील मुळांना (Strong Root) मजबूत बनवण्यासाठी या विद्राव्य खताचा वापर प्रामुख्याने केला जातो. परंतु अनेक शेतकरी बांधवांना 12-61-00 हे विद्राव्य खत सोयाबीन फुल अवस्थेत चालेल का असा प्रश्न पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 50 टक्के पेक्षा जास्त फुल लागले असेल तर शक्यतो या खताचा वापर टाळावा. कारण 12-61-00 या विद्राव्य खतामध्ये 12 टक्के नत्र (12% Nitrogen) आणि 61 टक्के स्पूरद (61% Phospharus) आहे.
• विद्राव्य खत 12-61-00 कधी वापरावे?
विद्राव्य खत 12-61-00 हे सोयाबीन पिकात नेमकी फुल अवस्था सुरू झाली असेल आणि तुम्हाला फवारणी करणे शक्य असेल तर अश्या वेळी 12-61-00 वापरावे. परंतु सोयाबीन पिकात फुलांची संख्या 50 टक्के पेक्षा अधिक लागली असेल तर अश्या वेळी 12-61-00 विद्राव्य खत फवारणी टाळावे, कारण यात 12 टक्के नत्र असल्यामुळे फुलगळ पाहायला मिळू शकते.
• विद्राव्य खत 12-61-00 प्रती पंप साठी प्रमाण किती?
सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी तुम्ही फुल अवस्था सुरू होण्याअगोदर सोयाबीन पेरणी पासून 40 ते 45 दिवसाला या विद्राव्य खताचा वापर करू शकता. या विद्राव्य खताच्या वापरामुळे तुम्हाला सोयाबीन पिकात फुटवा चांगला पाहायला मिळणार आहे. प्रति 20 लिटर पाणी साठी 100 ग्रॅम 12-61-00 विद्राव्य खत वापरावे..
• विद्राव्य खत नुकसान :-
विद्राव्य खत वापरण्यासाठी तुम्हाला अचूक डोस घ्याचा आहे. डोस प्रमाण वाढवल्यास सोयाबीन पाने जळणे किंव्हा फुल गळ होणे पाहायला मिळू शकते. तसेच विद्राव्य खत 100 टक्के पाण्यात विरघळून घ्यावे आणि नंतरच वापर करावा. इतर कीटकनाशक किंव्हा बुरशीनाशक मध्ये विद्राव्य खत टाकल्यास द्रावण नासत असेल तर असे द्रावण फवारणीसाठी वापरू नये.
• विद्राव्य खत 12-61-00 फायदे काय? 12-61-00 फायदे..
विद्राव्य खत 12-61-00 मुळे पिकाची वाढ नियंत्रणात राहून फुटवा आणि मुळांची वाढ जोमदार होते. तसेच पिकाला नत्र आणि स्पुरद दोन्ही प्रथम अन्नद्रव्य उपलब्ध होतात. पिकाची निरोगी वाढ होऊन किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच पीक उत्पादनात मोठी वाढ होत..