E-Pik Pahani Jalna; शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी महत्वाची आहे नाही तर सरकारी लाभ मिळणार नाही..
व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादकांना 5000 रुपये हेक्टरी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हे अनुदान फक्त अश्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाची ई-पीक पाहणी ॲप किंव्हा पोर्टल द्वारे नोंद असलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन अनुदान मिळणार आहे.
• ई-पीक पाहणी का महत्वाची :-
कुठ्ल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तुम्ही ई-पीक पाहणी केली असेल तरच तुम्हाला पीक विमा किंव्हा पीक अनुदान मिळणार आहे.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उदया दिनांक/ 01 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर म्हणजे गुरुवारपासून पुढील 45 दिवस मोबाईल ॲप द्वारे ई-पीक पाहणी करता येणार आहे. अतिवृष्टीमुळे किंव्हा नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करते परंतु आता अनुदान किंव्हा पीक विमा शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर ई-पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
• जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी..
जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी उदया दिनांक/ 01 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत ई-पीक पाहणी ॲप द्वारे तुम्हाला पीक पाहणी करता येणार आहे. या 45 दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन ई-पीक पाहणी नोंद करावी. ज्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी यापुढे सरकारी योजेपसून वंचित राहणार नाही. शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर ई-पीक पाहणी अत्यंत आवश्यक आहे.
सन 2021 मध्ये राज्य सरकारने ई-पीक पाहणी सुरू केली असून, प्रत्येक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. कारण गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक केली नसेल तर कापूस व सोयाबीन उत्पादकांना 5000 रुपये हेक्टरी अनुदान मिळणार नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ई-पीक पाहणी करून आपल्या शेतातील पिकाची नोंद करावी म्हणजे यापुढे प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल त्यासाठी दिनांक/ 01 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या 45 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला राज्य सरकारने सांगितलेल्या ॲप द्वारे ई-पीक पाहणी करून घ्याची आहे.
• ई-पीक पाहणी ॲप :-
राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी जलद गतीने करता यावी त्यासाठी सरकारने ई-पीक पाहणी ॲप अनल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु आजूनही काही शेतकरी ई-पीक पाहणी करण्यापासून वंचित आहे त्यामुळे त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी ॲप द्वारे ई-पीक पाहणी दिनांक/ 01 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या 45 दिवसात करून घेण्याचा सल्ला जालना निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांना दिला आहे धन्यवाद..