सोयाबीन फुल अवस्थेत या चार चुका अजिबात करू नका मोठ नुकसान होईल!
व्हायरल फार्मिंग :- शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादन एकरी 12 ते 15 क्विंटल घ्यायचे असेल तर सोयाबीन पिकात फुल संख्या भरघोस लागणे गरजेचे आहे. आपल्याला एकरी सोयाबीन उत्पादन किती होणार हे सोयाबीन खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन अश्या अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. परंतु सोयाबीन पिकात फुल संख्या लागल्यावर आपण नकळत काही चुका केल्या तर आपले 100 टक्के उत्पादन घटणार आहे.
राज्यातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी नवीन असतात म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केलेली असते त्यामुळे सोयाबीन पिकाच्या फुल अवस्थेत नकळत काही चूक घडल्यामुळे सोयाबीन पिकात लागलेल्या फुलांची गळ होते आणि सोयाबीन उत्पादन घटते.
सोयाबीन पिकात 50 टक्के पेक्षा जास्त फुल संख्या लागली असेल तर चार चुका अजिबात करू नक.
1- तणनाशक फवारणी- शेतकरी मित्रांनो सोयाबीन उभ्या पिकात तन नियंत्रण करण्यासाठी मार्केट मध्ये अनेक वेगवेगळे तणनाशक आहेत. परंतु या तणनाशकांचा वापर करण्यासाठी सोयाबीन पेरणी पासून 18 ते 21 दिवस हा योग्य काळ आहे या काळात तन दोन किंव्हा चार पानावर असतात तसेच सोयाबीन पिक फुल अवस्थेत नसते त्यामुळे या काळात तणनाशक वापर आपण बिन्धास्त करू शकतो परंतु सोयाबीन फुल अवस्थेत आल्यावर तणनाशक फवारणी करणे ही सर्वात मोठी चूक होणार आहे ज्यामुळे आपल्या सोयाबीन पिकात खूप जास्त प्रमाणात फुलगळ होऊ शकते. शेतकरी मित्रांनो सोयाबीन फुल अवस्थेत तणनाशक वापरणे ही सोयाबीन फुलगळ होण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरू शकते.
2- गॅस पॉयझन वापरणे :- शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाच्या फुल अवस्थेत अळी नियंत्रण करण्यासाठी योग्य अळी नाशक वापरणे गरजेचे आहे. चुकीच्या औषध किंव्हा गॅस पॉयझन सारख्या हार्ड अळी नशकचा वापर केल्यास याचा विपरीत परिणाम सोयाबीन फुल अवस्थेत होतो आणि मोठ्या प्रमाणात फुलगळ पाहायला मिळते. अळी नाशक डोस फुल अवस्थेत फवारणी वेळी जास्त प्रमाणात झाला तर याचा विपरीत परिणाम सोयाबीन फुल अवस्थेत दिसून येतो.
3- नत्र युक्त खतांचा वापर :- सोयाबीन भर फुल अवस्थेत नत्र युक्त खतांचा वापर शक्यतो टाळावा, अनेक शेतकरी सोयाबीन पिकाची वाढ कमी असते म्हणून युरिया खत फेकतात पण सोयाबीन फुल अवस्थेत युरिया खत फेकल्यास सोयाबीन फुलांच्या पाकळ्या मध्ये एक दाणा जरी पडला तरी याचा विपरीत परिणाम सोयाबीन फुलगळ मोठ्या प्रमाणात होते. तसेच सोयाबीन फुल अवस्थेत नत्र युक्त विद्राव्य खतांचा वापर देखील टाळावा. सोयाबीन फुल अवस्था नत्र युक्त विद्राव्य खतांचा वापर केल्यास फुलगळ होऊ शकते. ज्या विद्राव्य खतात नत्र नाही असे विद्राव्य खते फुल अवस्थेत वापरावे.
4- अळी नियंत्रण :- सोयाबीन पिकाच्या फुल अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास याचा विपरीत परिणाम सोयाबीन फुलगळ म्हणून होतो, कारण सोयाबीन फुल अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव झाल्यास अळी फुल आणि फुलाच्या पाकळ्या तसेच देठ यावर प्रादुर्भाव करते आणि फुलाला डंक मारते त्यामुळे सोयाबीन फुलात पावसाचे पाणी गेल्यास सोयाबीन फुल काही दिवसात सडते आणि फुलगळ होते त्यामुळे सोयाबीन फुल अवस्थेत अळी नियंत्रण करणे तेवढेच महत्वाचे आहे.