कापुस तिसरी फवारणी कोणती आणि कधी करावी l Kapus tisri favarni

कापूस तिसरी फवारणी कोणती करावी व कधी करावी? kapus tisri favarni…

कापुस तिसरी फवारणी
कापूस तिसरी फवारणी कोणती करावी व कधी करावी? kapus tisri favarni…

व्हायरल फार्मिंग :- शेतकरी मित्रांनो कापूस पिकावर योग्य फवारणीचे नियोजन करून बोंड अळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी यासारख्या नुकसान करणाऱ्या किडीचे योग्य वेळी बंदोबस्त करू शकतो. अनेक शेतकरी बांधवांनी कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटी किंव्हा जुन महिन्यात सुरुवातीलाच केली आहे, त्यामुळे त्यांचे कापूस पिक तिसऱ्या फवारणी साठी आले आहे. कापूस तिसरी फवारणी कोणती करावी? कापूस तिसरी फवारणी कधी करावी? कापूस तिसरी फवारणी औषध कोणते? संपूर्ण माहिती या लेखात पाहू.

नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.

• कापूस तिसरी फवारणी कधी करावी? kapus tisri favarni kadhi karavi :-

शेतकरी मित्रांनो कापूस तिसरी फवारणी योग्य वेळी करणे गरजेचे आहे. कापूस दुसरी फवारणी तुम्ही 45 दिवसाला केली असेल तर तिसरी फवारणी 15 दिवसाच्या अंतराने 60 दिवसाच्या दरम्यान करावी. म्हणजे दोन महिन्याचा कापूस पिकात तिसरी फवारणी करण्यासाठी योग्य कालावधी आहे. कापूस 60 दिवसाचा झाल्यानंतर कापूस पिकात पाते आणि फुल संख्या भरपूर लागले. तसेच या कालावधीत अमावस्या देखील असते त्यामुळे अळीचे मादी पतंग फुलात किंव्हा पानावर अंडी घालतात व बोंड अळी मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे कापूस पिकात 60 दिवसाच्या दरम्यान तिसरी फवारणी करणे गरजेचे आहे.

• कापूस तिसरी फवारणी का करावी :-

कापूस तिसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे कारण कापूस पिकात फुल आणि पाते लागल्यावर बोंड अळी, मावा, तुडतुडे, फुल किडे आणि पांढरी माशी मोठ्या प्रमाणात येते, त्यामुळे कापूस पिकाचे नुकसान होण्याअगोदरच कापूस तिसरी फवारणी करून घ्यावी असा सल्ला कृषी तज्ञ देतात. कारण रस शोषण कीड कापूस पानातील रस शोषण करून घेतात आणि कापूस पिवळे पडू लागते व पाते गळ होते त्यामुळे किडीचे योग्यवेळी व्यवस्थापन करण्यासाठी तिसरी फवारणी करणे गरजेचे आहे.

• कापूस तिसरी फवारणी कोणती करावी :-

कापूस तिसरी फवारणी करण्यासाठी एक चांगल्या दर्जाचे अळी नाशक तसेच यासोबत रस शोषण कीड नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक व कापूस पिकात अन्नद्रव्य कमतरता भासत असेल तर टॉनिक किंव्हा विद्राव्य खत घेणे गरजेचे आहे. कापूस पिकात बुरशी दिसून येत असेल तर बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे.

टिप्स – पाते अवस्थेत पाते गळ जास्त होत असेल तर Planofix + Boron फवारणी करावी योग्य डोस कृषी सेवा केंद्रावर विचारून घ्यावा.

• कापूस तिसरी फवारणी औषध :-

बोंड अळी नियंत्रण :- Profenofos + Cypermethrin घटक असलेले प्रोफेक्स सुपर (Profex Super) हे 30 मिली प्रती 20 लिटर पंप घ्यावे.

किंव्हा…..

थ्रीप्स जास्त असेल तर Bio R 303 हे 30 मिली किंव्हा Regent 40 मिली प्रती पंप घायवे.

किंव्हा…..

सर्व रस शोषण किड नियंत्रण 10000 ppm निंबोळी अर्क घ्यावे.

किंव्हा…..

टॉनिक Tata Bahaar 40 मिली प्रती पंप किंव्हा Fantac Plus 10 मिली प्रती पंप कापूस पिकाच्या पाते आणि फुल अवस्थेत घ्यावे.

किंव्हा…..

विद्राव्य खत घ्यायचे झाल्यास पाते अवस्थेत 00-52-34 हे 80 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.

किंव्हा…..

बुरशीनाशक घ्यायचे झाल्यास Saaf 30 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.

सूचना :- कृषी सेवा केंद्रावर औषध खरेदी केल्यानंतर औषधांचे डोस तसेच कोणते औषध मिक्स करता येते कोणते नाही या सर्व गोष्टीची विचारपूस करूनच घ्यावे धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *