तूर शेंडे खुडणी करून एकरी 1.5 ते 2 क्विंटल जास्त उत्पादन घ्या! तूर शेंडे खुडणी कधी करावी?

आरेवा तूर शेंडे खुडणी करून एकरी 1.5 ते 2 क्विंटल जास्त उत्पादन घ्या! तूर शेंडे खुडणी कधी करावी?

तूर शेंडे खुडणी कधी करावी
तूर शेंडे खुडणी माहिती..

व्हायरल फार्मिंग : मागील खरीप हंगामात तूर पिकाचे उत्पादन व क्षेत्र कमी झाल्याचे आढळून आले, त्याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्यावर्षी जुन महिन्यात पडलेला पावसाचा खंड. मागील खरीप हंगामात तूर उत्पादन कमी झाल्यामुळे तुरीची मागणी बाजार पेठेत वाढली आणि तुरीचे भाव गगनाला जाऊन भिडले काही बाजार समितीमध्ये तूर तब्बल 12 हजार रुपये प्रति क्विंटल विकली आहे, तसेच दिनांक/ 3 ऑगस्ट 2024 वार शनिवारी (लातूर) बाजार समिती मध्ये लाल तुरीला जास्तीचा भाव 11 हजार रुपये मिळाला आहे.

तुरीला चांगला भाव मिळत असल्यामुळे यंदा तुर पिकाची लागवड वाढली आहे. परंतु तूर पिकाचे लागवड क्षेत्र वाढले म्हणजे तुरीचे उत्पादन वाढणार नाही, तर तुरीचे उत्पादन वाढीसाठी तूर शेंडे खुडणी अत्यंत महत्त्वाची आहे.

तसेच तूर शेंडे खुडणी करून एकरी तब्बल 1.5 ते 2 क्विंटल पर्यंत जास्तीचे उत्पादन आपल्याला मिळू शकते असे संशोधनातून दिसून आले आहे. कमी खर्चात तूर उत्पादन वाढीसाठी तूर शेंडे खुडणी हा उत्तम पर्याय आहे.

परंतु तूर उत्पादन वाढीसाठी तूर शेंडे खोडनी कधी करावी? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. तूर पिकात वाढीच्या अवस्थेत योग्य वेळी शेंडे खोडनी केल्यास फुटवा चांगला लागतो आणि उत्पादनात वाढ होते.

• तूर शेंडे खुडणी कधी करावी?

तूर उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनाने तूर शेंडे खुडणी अत्यंत महत्त्वाची आहे. तूर शेंडे खोडणी करण्याचा योग्य वेळ कोणता पाहा..👇👇👇👇
तूर शेंगे खोडणी पिकाच्या वाढीच्या अवस्थेत करावी म्हणजे तूर पीक लागवडीपासून दीड (तूर लागवडीपासून 45 दिवसांनी) महिन्याने तूर शेंडे खोडणी करावी हा तूर शेंडे खोडणी करण्याचा योग्य वेळ आहे. कारण या अवस्थेत तूर पिकाचा शेंडा खूप वाढतो हा शेंडा खोडून घेतल्यास तूर पिकाची शेंड्याकडील वाढ थांबते आणि फांद्याकडील वाढ सुरू होते.

तूर लागवडीपासून दीड महिन्याने तुरीचा शेंड्याकडील शेंडा 4 इंचापर्यंत खोडून घेतल्यास जवळपास 20 टक्के अधिक तूर पिकात फळ फांद्या जास्त लागतात आणि एकरी तब्बल 1.5 क्विंटल पर्यंत उत्पादन वाढते असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे हाताने किंव्हा मशीनने तूर शेंडे खोडणी कमीत कमी एकदा तरी करून घ्यावी असा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे.

• तूर शेंडे खुडणी नंतर बुरशीनाशक फवारणी का करावी?

शेतकरी मित्रांनो तूर पिकाचे चार इंचापर्यंत शेंडे खोडून घेतल्यास त्या शेंड्याकडील भागातून चिकट द्रव बाहेर येतो व ढगाळ वातावरण किंव्हा पाऊस असेल तर बुरशी वाढते, त्यामुळे हाताने किंव्हा मशीनने तूर शेंडे खोडून घेतले असेल तर त्यांनतर दुसऱ्या दिवशी Carbendazim + Mancozeb बुरशीनाशक फवारणी 30 ग्रॅम प्रति पंप या प्रमाणे करून घ्यावी.

• तूर शेंडे खुडणी किती वेळा करावी?

तूर शेंडे खुडणी एकच वेळा करावी अनेक शेतकरी दोन किंव्हा तीन वेळा करतात. परंतु कृषी संशोधनाच्या माहितीनुसार तुर पिकात लागवडीपासून 45 दिवसांनी शेंडा खुडणी एकदाच केली, तरी त्याचा फायदा शंभर टक्के होतो. परंतु अनेक शेतकरी दोन किंव्हा तीन वेळा करतात जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 30, 45 आणि 60 दिवसाला तीन वेळा शेंडे खोडून घेऊ शकता.

• तूर शेंडे खोडणी यंत्र?

तूर शेंडे खोडून घेण्यासाठी तुम्ही तूर शेंडे खोडणी यंत्राचा वापर करू शकता किंव्हा हाताने देखील तूर शेंडे खोडून घेऊ शकता, परंतु तूर शेंडे खोडणी यंत्रापेक्षा हाताने अधिक वेळ लागतो. त्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी तूर शेंडे खोडून घेण्यासाठी यंत्राचा वापर करतात.

• तूर शेंडा किती खोडून घ्यावा?

तूर शेंडे खोडून घेण्यासाठी साधारण तूर पिकाचा शेंड्याकडील भाग 3 ते 4 इंच खोडून घ्यावा. तुरीचा शेंडा खोडून काढल्यास तूर पिकात भरघोस फुटवा लागतो, म्हणजे फळ फांद्या लागतात व शेंगांचे प्रमाण जास्त लागून एकरी 1.5 क्विंटल पर्यंत अधिक उत्पादन होते असे कृषी संशोधनातून दिसून आले आहे.

• तूर शेंडे खुडणी फायदे?

तूर शेंडे खोडणी करण्याचे अनेक सकारात्मक फायदे दिसून येतात. जसे की तूर पिकात फळ फांद्या जास्त लागणे. तूर पिकाची शाखीय वाढ होणे. तूर पिकात शेंगांचे प्रमाण अधिक लागणे. एकरी तुरीचे अधिक उत्पादन मिळणे. तूर उत्पादन खर्च कमी होणे असे अनेक फायदे तूर शेंडे खोडून घेतल्यास दिसून येतात..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *