कापूस गळ फांदी काढणी योग्य की अयोग्य | कापूस गळ फांदी कशी वळखावी?
व्हायरल फार्मिंग : कापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो कापूस गळ फांदी काढण्याच्या अगोदरच गळ फांदी नेमकी कोणती आहे. कापूस गळ फांदी आणि फळ फांदी कशी वळखावी? गळ फांदी काढण्याचे फायदे? संपूर्ण माहिती या लेखात पाहू…
कापूस पिकाचे उत्पादन वाढीसाठी देशातील अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. त्यातलाच एक अनोखा प्रयोग म्हणजे कापूस पिकात बोंड संख्या वाढवण्यासाठी व फळ फांद्यांना जास्तीत जास्त जमिनीतून अन्नपुरवठा होण्यासाठी अनेक शेतकरी कापूस पिकाची गळ फांदी काढतात.
कापूस गळ फांदी म्हणजे काय :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वप्रथम गळ फांदी म्हणजे काय याबद्दल माहिती असावी, कारण अनेक नवीन कापूस उत्पादक शेतकरी गळ फांदी म्हणून फळ फांद्या काढतात त्यामुळे त्यांना पाहिजे तसा फायदा कापूस उत्पादक वाढीसाठी होत नाही. गळ फांदी ओळखण्यासाठी कापूस पिकात पाते येणे गरजेचे आहे. जी फांदी फक्त वाढते व त्या फांदीवर पाते नसतात अशी फांदी म्हणजे गळ फांदी.
फळ फांदी म्हणजे काय :- ज्या फांदीच्या प्रतेक फुटव्यावर पाते आलेले असतात अशा फांदीला फळ फांदी म्हणून आपण ओळखतो. ज्या फांदीवर पाते आहे अश्या फांद्या काढू नये कारण ही फांदी कापूस पिकातील फळ फांदी असून या फांदी पासून तुम्हाला उत्पादन मिळणार आहे.
गळ फांदी कशी काढावी :-
शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादन वाढीसाठी गळ फांदी काढणे आवश्यक आहे. कारण कापूस पिकाच्या फळ फांद्या वाढल्या तरच कापूस उत्पादन वाढणार आहे. गळ फांदी जर तुम्ही काढली तर फळ फांदीला अन्नपुरवठा जास्त प्रमाणात होणार व कापूस बोंड पोसण्यासाठी जबरदस्त फायदा दिसून येणार. कापूस गळ फांदी पाते आल्यावर म्हणजे 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान तुम्ही हाताने किंव्हा शिक्याटरने काढू शकता.
गळ फांदी काढण्याचे फायदे?
1- गळ फांदी काढल्यामुळे झाडावर अतिरेक असलेल्या पानाची व फांद्यांची संख्या कमी होते व कापूस शेतात हवा खेळती राहते.
2- कीटकनाशक वापर कमी होते.
3- पाते आणि बोंड संख्या जास्त लागते कारण प्रत्येकी 2 ते 3 इंचवर फळ फांदी लागते.
4- गळ फांदी काढल्यास फळ फांदीला अधिक अन्नपुरवठा होतो व पाते आणि बोंड संख्या जास्त लागते.
5- पाते गळ कमी होते कारण कापूस पिकात हवा सुरळीत खेळती राहते.
6- गळ फांदी काढल्यास बोंड पोसण्यासाठी प्रचंड अन्नपुरवठा होतो आणि बोंड चांगले मोठे होते.
7- कापूस शेतात हवा खेळती राहून मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुल किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
8- बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पाते गळ होत नाही.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा…