फक्त काही तास बाकी लगेच बॅटरी फवारणी यंत्र ऑनलाईन अर्ज करून घ्या. Battery Sprayer Online Application..
व्हायरल फार्मिंग :- नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा, त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्यातच एक कापूस आणि गळ धान्य पिकासाठी 100 टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी यंत्र या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
महा डीबीटी च्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना राबवल्या जातात, त्यामुळे सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधार मोबाईल लिंक असणे बंधनकारक आहे. कारण DBT द्वारे शेतकऱ्यांचा खात्यात योजनेचे पैसे जमा केले जातात.
• बॅटरी फवारणी यंत्र अर्ज कसा करावा?
शेतकरी मित्रांनो शेवटचे काही तास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी राहिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला महा डीबीटी अंतर्गत बॅटरी फवारणी यंत्राचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. कारण दिनांक/ 06 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :-
• महा डीबीटी अधिकृत वेबसाईटवर जावे.
• त्यानंतर तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.
• त्यांनतर तुमचे प्रोफाइल उघडेल तुमचे प्रोफाइल मध्ये सर्व अचूक माहिती भरलेली असावी म्हणजे 100 टक्के कंप्लीट असावी.
• त्यांनतर तुम्हाला अर्ज करा यावर क्लिक करून घ्यायचे आहे.
• कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शन समोर तुम्हाला क्लिक करून समोर जायचे आहे.
• त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन विचारले जातील ते तुम्हाला निवडायचे आहे.
• पाहिलं ऑप्शन :- मुख्य घटक असेल त्यावर क्लिक करून (कृषी यंत्र अवजराच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य) हे ऑप्शन निवडायचे आहे.
• त्यानंतर दुसरे ऑप्शन :- तपशील निवडा यावर क्लिक करून (मनुष्य चलित औजारे) हे ऑप्शन निवडायचे आहे.
• त्यांनतर तिसरे ऑप्शन :- यंत्रसामुग्री/आवजारे/उपकरणे या ऑप्शन वर क्लिक करून (पीक संरक्षण अवजारे) हे ऑप्शन निवडायचे आहे.
• त्यांनतर खाली मशीनचा प्रकार या ऑप्शन वर जाऊन (बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस आणि गळीत धान्य) असे ऑप्शन असेल तुम्हाला पंप ज्यासाठी पाहिजे ते ऑप्शन निवडा..
• त्यानंतर मी पूर्ण संमतीशिवाय यंत्र घेणार नाही या बॉक्स मध्ये क्लिक करा व जतन करा.
• जतन करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर तुम्हाला 23 रुपये 60 पैशाच चलन भराव लागणार आहे. परंतु तुम्ही यागोदर अर्ज केला असेल तर तुम्हाला चलन फाडण्याची गरज नाही.
• हे सर्व झाल्यानंतर (मी अर्ज केलेल्या बाबीवर) क्लिक करा त्यांनतर (छाननी अंतर्गत अर्ज) यावर क्लिक करून तुम्हाला अर्ज दाखवला जाणार आहे.
• नंतर या योजनेची लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला तुमचे कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
कापूस व गळीत धान्य पिकासाठी बॅटरी फवारणी यंत्र या योजनेअंतर्गत मिळणार असून ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेतली आहे धन्यवाद..