तूर फवारणी वेळापत्रक! तूर पहिली, दुसरी आणि तिसरी फवारणी कधी करावी संपूर्ण माहिती..

तूर फवारणी वेळापत्रक! तूर पहिली, दुसरी आणि तिसरी फवारणी कधी करावी संपूर्ण माहिती.. (Tur Favarni Vyavasthapan)..

tur favarni vyavasthapan तूर फवारणी वेळापत्रक
तूर फवारणी वेळापत्रक! तूर पहिली, दुसरी आणि तिसरी फवारणी कधी करावी संपूर्ण माहिती.. (Tur Favarni Vyavasthapan)..

व्हायरल फार्मिंग : तूर पीक हे राज्यातील अत्यंत महत्वाचे कडधान्य पीक असून 160 ते 170 दिवसाचे पीक आहे. तूर पिकावर योग्य फवारणी नियोजन केल्यास एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन घेणे शक्य आहे. कारण तूर पिकाच्या सुरुवातीपासूनच तूर पिवळी पडणे, तूर मर लागणे, फुटवा कमी लागणे, वाढ कमी होणे किंव्हा पाने गुंडाळणारी अळी अश्या अनेक समस्या तूर पिकात दिसून येतात. त्यामुळे तूर पहिली फवारणी कधी आणि कोणती करावी? तूर पहिली फवारणी औषध? अश्या सर्व गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहे.

तूर पिकासाठी एकूण तीन वेळा फवारणी व्यवस्थापन केल्यास भरघोस उत्पादन मिळते.

• पहिली फवारणी :- तूर पिकाच्या 20 टक्के फुल अवस्थेत करावी म्हणजे फुलांची संख्या जास्त लागेल तसेच फुलगळ कमी होऊन उत्पादन वाढेल. अनेक वेळा तूर फुल अवस्थेत येताच वातावरण ढगाळ असते, त्यामुळे तूर पिकाच्या फुल अवस्थेत अळी आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे तूर पिकात फुलांची गळ जास्त होते.

• तूर पहिली फवारणी औषध :-

अळीचे प्रमाण अधिक असेल तर Emamectine Benzoate 5% SG प्रती 20 ली पंप साठी 15 ग्रॅम घ्यावे.

+

तूर फुल कळी अवस्थेत Chelated Zink 20 ग्रॅम प्रति 20 ली पाण्यात घ्यावे.

+

Saaf (Carbendazim + Mancozeb) बुरशीनाशक 40 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.

• तूर दुसरी फवारणी औषध :-

तूर दुसरी फवारणी साधारण 50 टक्के पापडी अवस्थेत करावी. कारण या अवस्थेत शेंग पोखरणारी किंव्हा पाने खाणारी अळी दिसून येते.

Ampligo कीटकनाशक 10 मिली प्रती पंप किंव्हा Evicent 3 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.

+

पापडी भरण्यासाठी 00-52-34 विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.

+

मर रोग आढळून येत असेल तर Roko बुरशीनाशक 40 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.

• तूर तिसरी फवारणी औषध :-

तूर पिकाच्या शेंगात 50 टक्के दाणे भरण्याच्या अवस्थेत तिसरी फवारणी करावी, या अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे तूर शेंग अवस्थेत चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापरणे गरजेचे आहे.

कीटकनाशक :- Coragen (Chlorantroniliprole) 8 मिली प्रती 20 ली पंप साठी घ्यावे.

+

शेंग अवस्थेत दाणे टपोरे व वजनदार होण्यासाठी 00-00-50 विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रति 20 ली पंप घ्यावे.

+

शेंग अवस्थेत ढगाळ वातावरण असेल आणि शेंग करपत असेल तर Saaf बुरशीनाशक 40 ग्रॅम प्रति पंप घ्यावे.

शेतकरी मित्रांनो यंदा तुरीचा भाव पाहता तूर पिकात तीन फवारण्या करणे गरजेचे आहे. आपण योग्य फवारणी नियोजन केल्यास कीड नियंत्रण व मर रोग नियंत्रण वेळीच करून तूर उत्पादनात होणारी घट कमी करू शकतो धन्यवाद….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *