शनिवार पासून राज्यात सर्वदूर सूर्यदर्शन होण्याची शक्यता?
व्हायरल फार्मिंग : अनेक दिवसापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात सुरू असलेल्या पावसाचा जोर आज काही प्रमाणात कमी झाल्याचा दिसून येत आहे. आज दिनांक/ 06 ऑगस्ट पासून पुढील तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहून काही भागात हलका, मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल.
परंतु दिनांक/ 10 ऑगस्ट शनिवार पासून राज्यातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून सर्वदूर कोरडे हवामान राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
कोकणातील पावसाचा जोर कमी झाला असून मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. परंतु उदया दिनांक/ 07 आणि 08 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर काहीसा राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे, विशेष या दोन दिवसांमध्ये विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे.
आज मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी सूर्यदर्शन राहणार असून कोचीत भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दिनांक/ 06 ऑगस्ट हवामान अंदाज :-
आज विदर्भ सोडता राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण तर काही भागात सूर्यदर्शन काही भागात अत्यंत अल्प प्रमाणात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आज मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अल्प प्रमाणात विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम आणि अकोला या सर्व जिल्ह्यांना आज विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच बुधवार आणि गुरुवार पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा जोर काहीसा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिनांक/ 07 आणि 08 ऑगस्ट हवामान अंदाज :-
बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात पुन्हा पावसाचा जोर थोडा वाढणार असून अनेक जिल्ह्यातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. आज पासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल होणार असून सर्वदूर ढगाळ वातावरण तर विदर्भ आणि कोकणात काहीसा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील उदया दिनांक/ 08 ऑगस्ट बुधवार रोजी जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात विजेच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच उदया पुणे आणि सातारा घाट माथा भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात उदया बुधवार आणि गुरुवार रोजी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.