राज्यात 11 ऑगस्ट पासून सूर्यदर्शन! पाऊस थांबणार पंजाब डख.. Panjabrao Dakh Havaman Andaj Live..
व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाब डख यांचा नवीन अंदाज आला असून आज दिनांक/ 07 ऑगस्ट 11 ऑगस्ट दरम्यान राज्यात पाऊस बरसणार आहे परंतु सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे 11 ऑगस्ट पासून राज्यात पाऊस थांबणार असून सर्वदूर दूरदर्शन होणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे.
आज दिनांक/ 07 ऑगस्ट रात्री विदर्भात पावसाचा जोर राहणार असून विदर्भातील काही जिल्ह्यांना मुसळधार पाऊस बरसणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी दिली आहे. आज पासून पुढचे तीन दिवस पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर चांगला राहणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतीचे काम पूर्ण करून घ्यावे.
दिनांक/ 10 ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत दररोज पाऊस पडत राहणार आहे. त्यातच दिनांक/ 11 ऑगस्ट पासून राज्यात सर्व दूर कोरडे वातावरण होणार असून पाऊस थांबणार आहे अशी माहिती पंजाबराव डख दिली आहे.
आज पासून 10 ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे परंतु या पावसाचा जोर सर्वाधिक पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात राहणारा असून जोरदार पडणार आहे. तसेच मराठवाड्यात 10 ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस पडणार असून सर्व दूर ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. अशीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातही पाहायला मिळणार आहे.
कडक सूर्यदर्शन:-
शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक परिसरामध्ये मुसळधार पाऊस अनेक दिवसापासून पडत आहे त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे दिनांक/ 11 ऑगस्ट पासून ते 16 ऑगस्ट पर्यंत पुढील पाच दिवस कडक सूर्यदर्शन होणार असून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दिनांक/ 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान राज्यातील मराठवाड्यात सूर्यदर्शन कडक राहणार असल्याची माहिती डख यांनी दिली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या 19 तारखेपासून पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असून शेतकऱ्यांनी 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान शेतीचे कामे पूर्ण करून घ्यावे असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.
ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये.
पुर्व विदर्भ :-
आज दिनांक/ 07 ऑगस्टच्या रात्रीपासूनच पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार होणारा असून पाऊस पडणार आहे. तसेच पश्चिम विदर्भातही आजपासून पुढचे तीन दिवस जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती डख यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..