सोयाबीन वाढ कमी करण्यासाठी दुसरी फवारणी कोणती करावी? (Soyabean Dusari Favarni)..
व्हायरल फार्मिंग : शेतकरी मित्रांनो यंदा ज्या भागात सतत धार पाऊस सुरू राहिला किंव्हा ढगाळ वातावरण राहिले त्या भागातील सोयाबीन अती जास्त प्रमाणात वाढले आहे. तसेच वाढ जास्त असून 50 टक्के पेक्षाही जास्त प्रमाणात फुल संख्या लागली आहे. सोयाबीन फुल संख्या वाढवण्यासाठी तसेच सोयाबीन वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत.
मित्रांनो तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल व ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या गावातील शेतकऱ्यांना व नातेवाईकांना जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा.
• सोयाबीन का वाढले?
यंदा सोयाबीन वाढीसाठी चांगले पोषक वातावरण मिळाले आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांची जमीन भारी असून त्या शेतकऱ्यांनी अतिरेक नत्र युक्त खतांचा वापर केला आहे, त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पिकाची मर्यादेपेक्षा अधिक वाढ झाली आहे. सोयाबीन वाढ अधिक झाल्यास फुटवा कमी लागतो, फुल संख्या कमी लागते व शेंगांचे प्रमाण कमी लागून उत्पादनात घट पाहायला मिळते. त्यामुळे सोयाबीन वाढ नियंत्रणात ठेऊन सोयाबीन पिकात फुटवे वाढवण्यासाठी आपल्याला काय नियोजन करता येईल ते पाहू.
• सोयाबीन अधिक वाढीचे नुकसान.
1- सोयाबीन पिकाची मर्यादेपेक्षा जास्त वाढ झाल्यास दाटी निर्माण होते.
2- सोयाबीन पिकाच्या शेतात हवा खेळती राहत नाही.
3- किडींचा प्रादुर्भाव वाढतो व फवारणी खर्च वाढतो.
4- रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
5- सोयाबीन जास्त वाढल्यामुळे फुटवे कमी लागतात.
6- सोयाबीन जास्त वाढल्यामुळे फुलांची संख्या कमी लागते.
7- सोयाबीन जास्त वाढल्यामुळे फुलगळ जास्त पाहायला मिळते.
8- सोयाबीन उत्पादनात घट पाहायला मिळते.
• सोयाबीन वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय :-
सोयाबीन पिकाची अतिरेक वाढ होत असेल व तुमचे सोयाबीन पिक नेमके फुल अवस्थेत येत असेल तर तुम्ही pgr चा वापर करू शकता.
त्यासाठी Lihocin 20 मिली प्रती 20 ली पंप.
किंव्हा
Taboli 3 मिली प्रती पंप
किंव्हा
Cultar 5 मिली प्रती पंप
वरील pgr पैकी कोणतेही एक फुल अवस्था सुरू होण्याअगोदर दुसऱ्या फवारणी मध्ये घ्यायचे आहे.
• सोयाबीन वाढ खूप आहे तसेच अधिक प्रमाणात फुल संख्या लागली तर हा उपाय करा.
शेतकरी मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात झाली असेल तर तुम्हाला दुसऱ्या फवारणी मध्ये कोणत्याही प्रकारचे pgp टॉनिक वापरायचे नाही. कारण टॉनिक वापरल्यामुळे सोयाबीन पिकाची शेंड्याकडील वाढ अधिक होते. दुसरी गोष्ट अनेक शेतकरी नत्र युक्त विद्राव्य खतांचा वापर दुसऱ्या फवारणी मध्ये करतात, परंतु तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ खूप जास्त झाली असेल तर नत्र युक्त विद्राव्य खतांचा वापर टाळावा.
• सोयाबीन वाढ अधिक असलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन दुसरी फवारणी ही करावी..
सोयाबीन पिकातील अळी नियंत्रण करण्यासाठी Evicent 3 ग्रॅम प्रति पंप किंव्हा Emamectine Benzoate 5% 15 ग्रॅम प्रति पंप किंव्हा Ampligo 10 मिली प्रती पंप किंव्हा Alika 10 मिली प्रती पंप यापैकी कोणतेही एकच वापरावे.
त्यांनतर सोयाबीन पिकाची वाढ जास्त असलेल्या शेतकऱ्यांनी 00-52-34 विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रति पंप घ्यावे, तसेच Boron 20% 20 ग्रॅम प्रति पंप घेतल्यास सोयाबीन फुल अवस्थेत चांगला फायदा पाहायला मिळतो. सोयाबीन पिकात बुरशी जास्त प्रमाणात वाढली असेल तर Saaf 40 ग्रॅम प्रति पंप किंव्हा Roko 40 ग्रॅम प्रति पंप किंव्हा Haru 40 ग्रॅम प्रति पंप किंव्हा Bavistin 40 ग्रॅम प्रति पंप यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक सोयाबीन दुसऱ्या फवारणी मध्ये वापरावे.