सोयाबीन तिसरी फवारणी कधी आणि कोणती करावी? सोयाबीन तिसरी फवारणी..!

सोयाबीन तिसरी फवारणी कधी आणि कोणती करावी? सोयाबीन तिसरी फवारणी..! (Soyabean Tisri Favarni Mahiti).

सोयाबीन तिसरी फवारणी कोणती करावी माहिती.
सोयाबीन तिसरी फवारणी शेंग अवस्थेत कोणती करावी संपूर्ण माहिती..

व्हायरल फार्मिंग :- नमस्कार सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांनो, तुमचे व्हायरल फार्मिंग संकेतस्थळावर सहर्ष स्वागत आहे. आज आपण सोयाबीन पिकासाठी तिसरी फवारणी कोणती करावी? सोयाबीन तिसरी फवारणी कधी करावी? सोयाबीन शेवटची फवारणी औषध कोणते वापरावे? सर्व अचूक माहिती घेणार आहोत तरी माहिती शेवटपर्यंत वाचा.

• सोयाबीन तिसरी फवारणी का करावी?

शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाच्या शेंग अवस्थेत शेंग पोखरणारी अळी (Pod Borer) खूप नुकसान करते, तसेच सोयाबीन शेंगावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीन शेंग करपून जाते व सोयाबीन उत्पादन मोठी घट झालेली पाहायला मिळते, त्यामुळे सोयाबीन पिकात तिसरी फवारणी करावी लागते. तसेच सोयाबीन पिकाच्या शेंग अवस्थेत विद्राव्य खतांचा वापर करून आपण सोयाबीन पिकासाठी अन्नपुरवठा करू शकतो, त्यामुळे सोयाबीन शेंग टपोरी होऊन वजनदार होते आणि उत्पादन वाढलेले पाहायला मिळते.

• सोयाबीन तिसरी फवारणी कधी करावी?

अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की सोयाबीन पिकाच्या कोणत्या अवस्थेत किंव्हा सोयाबीन लागवडीपासून किती दिवसानंतर तिसरी म्हणजे शेवटची फवारणी करावी. तर मित्रांनो सोयाबीन लागवडीपासून 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान तिसरी फवारणी करावी किंव्हा 30 ते 40 टक्के शेंग भरण्याच्या अवस्थेत तिसरी फवारणी करून घ्यावी असा आमचा सल्ला आहे.

• सोयाबीन शेंग भरण्याच्या अवस्थेत तिसरी फवारणी फायदे?

1- शेंग अवस्थेत शेंगा पोखरणाऱ्या अळीचा वेळीच बंदोबस्त होतो.
2- सोयाबीन शेंग टपोरी होण्यासाठी तिसरी फवारणी खूप महत्वाची आहे.
3- सोयाबीन शेंगातील दाणे टपोरे आणि वजनदार होतात.
4- सोयाबीन दाणे चामदार होतात आणि बाजार भाव चांगला मिळतो.
5- सोयाबीन तिसऱ्या फावरणीत विद्राव्य खत वापरल्यास सोयाबीन शेंग भरण्यासाठी अन्नपुरवठा चांगला होतो.

• सोयाबीन तिसरी फवारणी वेळी काय काळजी घ्यावी..

1- सोयाबीन तिसऱ्या फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे.
2- कीटकनाशक प्रमाण कमी किंव्हा जास्त करू नये.
3- द्रावण चांगले मिक्स करून घ्यावे.
4- द्रावण फुटले असेल तर असे द्रावण फवारणीसाठी वापरू नये.
5- पावसाचे वातावरण असेल तर फवारणी मध्ये स्टिकर वापरावे.

• तिसरी फवारणी कोणती करावी? औषध व वापरायचे प्रमाण माहिती..

सोयाबीन तिसरी फवारणी सोयाबीन पिकाच्या 30 ते 40 टक्के शेंग भरण्याच्या अवस्थेत करावी किंव्हा सोयाबीन लागवडीपासून 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान करावी..
टिप्स – सोयाबीन तिसरी फवारणी ही शेंग अवस्थेत शेवटची फवारणी असून त्यात अधिक दिवस रिझल्ट देणाऱ्या कीटकनाशकाचा वापर करा.👇👇👇👇

कीटकनाशक :- Chlorantroniliprole घटक असलेले Coragen 6 मिली प्रती पंप किंव्हा Ampligo 10 मिली प्रती पंप या प्रमाणे घ्यावे.
तसेच सोयाबीन शेंग अवस्थेत शेंग पोसण्यासाठी 00-00-50 हे विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रति पंप घ्यावे, तसेच शेंगावर ठीबके किंव्हा करपा रोग दिसून आल्यास Saaf बुरशीनाशक 40 ग्रॅम प्रति पंप किंव्हा Haru बुरशीनाशक 40 ग्रॅम प्रति पंप या प्रमाणे घ्यावे धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *