लिंबू अंडी संजीवक घरच्या घरी कसे करावे:-
शेतकरी मित्रांनो खूप कमी खर्चात लिंबू अंडी या सामुग्री पासून घरच्या घरी अमिनो ऍसिड (Amino acid) कसे तयार करावे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ.
लिंबू अंडी संजीवक हे कुठ्ल्याही पिकासाठी उपयुक्त आहे. या टॉनिक चा वापर पिकाच्या कोणत्याही अवस्थेत करता येतो. लिंबू अंडी संजीवक हे आपल्या पिकाच्या जोमदार व निरोगी वाढीसाठी आवश्यक आहे. हे संजीवक तुम्ही खूप कमी खर्चात व खूप कमी वेळेत घरच्या घरी तयार करू शकता.
लिंबू अंडी संजीवक तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री:-
शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला 5 लिटर ची प्लास्टिक बरणी, गावरान कोंबडी ची 10 अंडी, 40 ते 50 लिंबू व 250 ग्राम गावरान गुळ ही सामुग्री लागणार आहे.
मित्रांनो अंड्यात भरपूर प्रमाणात अमिनो ऍसिड (Amino acid) असतात त्यालाच आपण प्रोटीन (Protein) म्हणतो, तसेच अंडी कवच या मध्ये कॅल्शियम (Calcium) चे प्रमाण भरपूर आहे.
लिंबू (Citrus) या फळात मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड (Citric acid) असतात तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम व इतर पोषक घटक असतात.
गावरान गुळ (Jaggery) या मध्ये मोठ्या प्रमाणात लोह (Iron) असतात.
लिंबू अंडी संजीवक कसे करावे:-
लिंबू अंडी संजीवक तयार करण्यासाठी आपल्याला 5 लिटर ची प्लास्टिक बरणी घ्याची आहे त्यानंतर त्या प्लास्टिक बरणी मध्ये 10 गावरान कोंबडी ची अंडी न फोडता टाकायची आहे व नंतर 40 ते 50 लिंबाचा रस तयार करून त्या प्लास्टिक बरणी मध्ये टाकावा व हे द्रावण 20 दिवस तयार होण्यासाठी ठेवावे परंतु दिवसातून कमीत कमी दोन वेळा हे द्रावण हलून घ्यावे व 20 दिवसा नंतर या द्रावणात 250 ग्राम बारीक करून गावरान गुळ टाकावा व दुसऱ्या दिवशी हे द्रावण फवारणी साठी वापरावे.
लिंबू अंडी संजीवक डोस – मित्रानो लिंबू अंडी संजीवक तयार केल्यानंतर प्रति 15 लिटर पंप साठी 150 मिली किंव्हा 20 लिटर पंप साठी 200 मिली याचा वापर फवारणी द्वारे करावा.
लिंबू अंडी संजीवक फवारणी फायदे:-
1- लिंबू अंडी संजीवक फवारणी केल्यानंतर पिकाची जोमदार व निरोगी वाढ होते.
2- लिंबू अंडी संजीवक फवारणी मुळे कमी खर्च लागतो.
3- लिंबू अंडी संजीवक फवारणी मुळे फुटवे भरपूर लागतात.
4- लिंबू अंडी संजीवक फवारणी मुळे फुलांची संख्या भरपूर लागते व फुल गळ होत नाही.
5- लिंबू अंडी संजीवक फवारणी मुळ झाडाला अमिनो ऍसिड मिळतात.
तर शेतकरी मित्रांनो आज आपण लिंबू अंडी संजीवक या टॉनिक बद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे धन्यवाद…