Edible Oils Rates : खाद्य तेलाची आयात वाढली! 15 लिटर डब्ब्यावर मोठी घसरण..
Today Edible Oils Rates:- जुलै महिन्यात विक्रमी 19 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले असून, ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. परंतु सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फक्त 4200 ते 4300 रुपये अश्या नीचांकी दराने विक्री करावी लागत आहे. गेल्या वर्षी गळीत धान्य लागवड कमी झाली असून याचा परिणाम खाद्य तेल तुटवडा होऊ नये त्यासाठी जुलै महिन्यात 19 लाख टन विक्रवी आयात करण्यात आली आहे. तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खाद्य तेल आयातीचा फटका देखील बसला आहे, त्यातच खरीप 2024 हंगामातील सोयाबीन पुढील काही महिन्यातच बाजारात येणार आहे. त्यामुळे खाद्य तेल आयात शुल्क वाढवा तसेच हमी भाव शेतकऱ्यांना मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
खाद्यतेल ग्राहकांना दिलासा :-
दररोजच्या आहारात खाद्य तेल हे अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक भाजी चवदार आणि रुचकर बनवण्यासाठी तेल हे खूप महत्त्वाचे आहे. तेल हे जीवनातील अत्यावश्यक पदार्थ बनला आहे. तसेच तेल आयात होत असल्यामुळे तेलाचे भाव काहीसे नरमले आहे. त्यामुळे ग्रहनीला काहीसा दिलासा मिळाला आहे. गोर गरीब आणि सर्व सामन्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Edible Oils Rates:- खाद्यतेल दर कसे आहे पाहा. Today Edible Oils Rates..
लोकल बाजारात सोयाबीन खाद्यतेल 105 रुपये ते 115 रुपये किलो विक्री होत आहे. तर सूर्यफूल तेल सरासरी 110 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे, तर शेंगदाणा तेल हे सरासरी 160 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.
खाद्यतेल 15 लिटर डब्याचे भाव:
1- सूर्यफूल तेल – 1600 रू
2- शेंगदाणा तेल – 2340 रू
3- सोयाबीन तेल– 1590 रू