खुशखबर; रेशन कार्ड धारकांना गणेश उत्सवात मिळणार आनंदाचा शिधा! Anandacha Shidha 2024….
Gauri Ganesh Festival Anandacha Shidha 2024 : राज्यातील शिधापत्रिका धारकांना खुशखबर गणेश उत्सवात 1.5 कोटी पेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिधा सरकारच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत? कारण राज्यात पुढील काही महिन्यातच विधानसभा आचारसंहिता लागणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात लागण्याचे संकेत असून सप्टेंबर महिन्यात गणेश उत्सवात रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याची दाट शक्यता आहे. आनंदाचा शिधा कोण असणार पात्र? कोणत्या वस्तू मिळणार? संपूर्ण माहिती या लेखात पाहू..
Ganpati Festival Anandacha Shidha:- नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे सर्वप्रथम स्वागत आहे. रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. गौरी गणपती उत्सवात 1.5 कोटी पेक्षा अधिक कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार असून, त्यात चार वस्तू तुम्हाला मिळणार आहे त्यात कोणकोणत्या वस्तू मिळणार खाली सविस्तर माहिती घेऊ.
गौरी गणेश उत्सवात रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी दिनांक/ 12 जुलै 2024 रोजी gr निर्गमित करण्यात आला असून, शिधापत्रिका धारकांना चार वस्तू 100 रुपये सवलतीत वाटप करण्यात येणार आहे.
केशरी रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दराने खाद्य पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी 2022 पासून पासून वेगवेगळ्या सणाला वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी सवलतीच्या दरात प्रति रेशन कार्ड धारकांना 1 शिधाजिन्नस संच वितरित करण्यात आले असून 2022 पासून अनेक सण साजरा करण्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.
सन 2022 च्या दिवाळीला सन गोड होवा, त्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. तसेच सन 2023 मध्ये गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निम्मित आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. तसेच गेल्या वर्षी गौरी गणेश उत्सवात देखील आनंदाचा शिधा पात्र कुटुंबांना देण्यात आला होता. तसेच सन 2024 च्या श्री राम प्राणप्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित आनंदाचा शिधा मिळाला होता, त्यातच आता सन 2024 वर्षातील गणेश उत्सवात देखील आनंदाचा शिधा मिळणार आहे.
आनंदाचा शिधा:-
राज्यातील रेशन कार्ड धारकांना गौरी गणेश उत्सवात मिळणार असून त्यासाठी 1 कोटी 70 लाख 82 हजार 86 इतक्या APL केशरी शेतकरी रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.
आनंदाचा शिधा वस्तू:-
APL केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना वेगवेगळ्या सना निम्मित सन आनंदात व गोड जावे त्यासाठी आनंदाचा शिधा वाटप केला जाती. गौरी गणेश उत्सवात 1 कोटी 70 लाख 82 हजार 86 इतज्या कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार असून त्यात खाली वस्तू एक किलो या प्रमाणात आहे.
1- रवा एक किलो.
2- चणाडाळ एक किलो.
3- साखर एक किलो.
4- सोयाबीन तेल एक लिटर.
या चार वस्तू मिळणार असून प्रती शिधापत्रिका धारकांना एक शिधाजिन्नस मिळणार आहे.
आनंदाचा शिधा वितरण कधी?
दिनांक/ 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत ई पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रति संच या सवलतीत वितरित करण्यात येणार आहे.
आनंदाचा शिधा कोणाला मिळणार?
ज्या रेशन कार्ड धारकांना या अगोदर आनंदाचा शिधा मिळाला आहे, अशाच रेशन कार्ड धारकांना गौरी गणेश उत्सवात आनंदाचा शिधा मिळणार असून त्यात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर सोयाबीन तेल अशा एकूण चार वस्तू फक्त 100 रुपयात मिळणार आहे धन्यवाद…