महा डीबीटी फवारणी यंत्र योजना; फवारणी पंप अर्जासाठी फक्त 3 दिवसच बाकी लगेच हे काम करा..

महा डीबीटी फवारणी यंत्र योजना; फवारणी पंप अर्जासाठी फक्त 3 दिवसच बाकी लगेच हे काम करा..

फवारणी यंत्र योजना
महा डीबीटी फवारणी यंत्र योजना; फवारणी पंप अर्जासाठी फक्त 3 दिवसच बाकी लगेच हे काम करा..

Maha DBT Favarni Yantra:- शेतकरी मित्रांनो नमस्कार अजूनही फवारणी पंपासाठी अर्ज केला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.

शेतकरी मित्रांनो महा डीबीटी पोर्टल (Maha DBT Portal) वर जाऊन बॅटरी चलीत फवारणी पंपासाठी लवकरात लवकर ऑनलाईन (Online) अर्ज करून घ्यावे, कारण फक्त ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 दिवसच उरलेले आहेत. आज दिनांक/ 11 ऑगस्ट असून बॅटरी चलित फवारणी पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी 14 ऑगस्ट ही शेवटची तारीख दिली असून अवघे तीनच दिवस आजपासून अर्ज करण्यासाठी उरले आहे.

त्यामुळे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी राहिले असून ज्या शेतकऱ्यांना महा डीबीटी द्वारे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांनी 14 ऑगस्ट च्या आत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. त्यानंतर लॉटरी पद्धतीने तुमची निवड करण्यात येणार असून तुम्हाला 100 टक्के अनुदानावर फवारणी पंप देण्यात येणार आहे.

बॅटरी चलीत फवारणी पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी सुरुवातीला 6 ऑगस्ट ही तारीख दिली होती. परंतु काही टेक्निकल अडचणींमुळे शेतकऱ्यांना फॉर्म भरणे शक्य झाले नाही, त्यामुळे 14 ऑगस्ट ही शेवटची तारीख दिली आहे. तरी आज दिनांक/ 11 ऑगस्ट पासून फक्त 3 दिवस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बाकी राहिले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे. पुन्हा अर्ज करण्यासाठी तारीख वाढेल का आत्ताच याबद्दल सांगता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तारीख वाढीची प्रतीक्षा न करता 14 ऑगस्टच्या अगोदरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.

शेतकरी बांधवांनो सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे 100 टक्के अनुदानावर बॅटरी चलीत फवारणी पंप मिळणार असून, महा डीबीटी पोर्टल वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

सोयाबीन व कापुस उत्पादकांना फवारणीसाठी नवीन फवारणी यंत्र खरेदी करावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो तसेच अनेक शेतकऱ्यांना फवारणी यंत्र खरेदी करणे शक्य होत नाही, त्यामुळे अनेक वेळा शेजारी असलेल्या शेतकऱ्यांचा फवारणी पंप घ्यावा लागतो. परंतु अनेक वेळा पंप वेळेवर न मिळाल्यामुळे किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढून पिकाचे प्रचंड नुकसान होते व फवारणी साठी औषध खर्चही वाढतो, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता महा डीबीटी द्वारे 100 टक्के अनुदानावर राज्यातील कापूस व गळीत धान्य उत्पादक शेतकऱ्यांना बॅटरी चलीत फवारणी पंप देण्याचा निर्णय घेतला असून ऑनलाईन अर्ज सुरू आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.

तसेच शेतकऱ्यांचा कापूस व सोयाबीन पिकावरील खर्च वाढत असून फवारणी व औषधी वरचा खर्च वाढत आहे. परंतु सोयाबीन व कापुस पिकास मिळत असलेला भाव मात्र कमी आहे. त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झालेले असून शेतकऱ्यांना फवारणी पंप खरेदी करण्यासाठी कठीण झाले आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला फवारणी पंप घ्यायचा असेल तर महा डीबीटी 100 टक्के अनुदानावर तुम्हाला बॅटरी चलीत फवारणी पंप देणार आहे. त्यामुळे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू असून 14 ऑगस्ट अगोदरच शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून घ्यावेत.

अर्ज कसा करावा?

महा डीबीटी पोर्टल वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करावा तुम्हाला माहिती नसेल तर खालील YouTube व्हिडिओ पाहा…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *