खुशखबर; कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे याच महिन्यात जमा होणार! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस.. Bhavantar Yojana 2024..
व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन व कापुस अनुदान व एक रुपये पीक विमा याबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज अकोल्यात दिली आहे. अकोल्याच्या सभेत आज सभेत बोलत असताना राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भावांतर योजना व एक रुपया पीक विमा या दोन योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सभेत बोलताना म्हणाले हे सरकार शेतकऱ्यांचे असून शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमी सकारात्मक भूमिका घेत आहे.
याच महिन्यात मिळणार सोयाबीन व कापुस अनुदान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस:-
आज अकोल्यातील सभेत देवेंद्र फडवणीस बोलताना म्हणाले लोकसभेच्या आधी भावांतर योजनेची घोषणा केली होती, परंतु त्यानंतर 72 तासातच आचारसंहिता लागल्यामुळे शेतकऱ्यांना भावांतर योजनेचे पैसे देणे शक्य झाले नाही. परंतु आता या योजनेचे पैसे याच महिन्यात 80 लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
तसेच खरीप 2023 कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजार भाव कमी मिळाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन व कापसाचे भाव दबावातच राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे त्यासाठी भावांतर योजनेची लोकसभेच्या आधीच घोषणा केली होती, परंतु घोषणा केल्यानंतर पुढील तीन दिवसातच आचारसंहिता लागल्यामुळे भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकता आले नाही परंतु आता याच महिन्यात भावांतर योजनेचे पैसे 80 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे.
एक रुपये पीक विमा शेतकऱ्यांचा बँक खात्यात होणार जमा..
एक रुपया पिक विम्याचे देखील पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी माहिती दिली आहे. अकोल्यातील सभेत राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलताना म्हणाले एक रुपया पीक विम्याचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून त्याची यादी देखील तयार झाली आहे पुढील 3 महिन्यात राज्यातील 1 कोटी 20 लाख शेतकऱ्यांचा थेट बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.
भावांतर योजनेची घोषणा लोकसभेच्या अगोदर झाली मात्र पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देणे शक्य झाले नाही, त्यामुळे ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भावांतर योजनेचे हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याच महिन्यात भावांतर योजनेचे पैसे मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यातील सभेत बोलत असताना दिली आहे.
तसेच राज्यातील एक रुपये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार झाली असून 1 कोटी 20 हजार पात्र शेतकऱ्यांना विमा वाटप सुरू झाली असून पुढील 3 महिन्यात सर्व शेतकऱ्यांचा आधार लिंक बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..