पोळा अमावस्या कापूस फवारणी कोणती करावी? | Pola Amavshya Kapus Favarni..

पोळा अमावस्या कापूस फवारणी कोणती करावी? | Pola Amavshya Kapus Favarni..

पोळा अमावस्या कापूस फवारणी माहिती
पोळा अमावस्या कापूस फवारणी कोणती करावी?

व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून पोळा अमावस्या झाल्यानंतर कापूस फवारणी कोणती करावी? पोळा अमावस्या कापूस फवारणी कधी करावी? पोळा अमावस्या फवारणी औषध? याबद्दल संपूर्ण माहिती घेणार असून तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर माहिती शेवटपर्यंत वाचा.

पोळा अमावस्या नंतर कापूस फवारणी का करावी?

शेतकरी मित्रांनो पोळ्याच्या अमावस्या नंतर कापूस पिकात बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त झालेला पाहायला मिळतो, कारण अमावस्या रात्री अत्यंत काळोखी रात्र असते त्यातच या रात्री अळीचे पतंग कापूस पिकाच्या पानावर तसेच पात्यात अंडी घालतात व चार दिवसानंतर या अंड्यातून कापूस पिकातील बोंड अळी बाहेर निघते, त्यामुळे कापूस बोंड अळी व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच फवारणी द्वारे बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

पोळा अमावस्या फवारणी : 

पोळ्याची अमावस्या झाल्यानंतर साधारण 72 तासात बोंड अळी नियंत्रण करण्यासाठी फवारणी घेणे गरजेचे आहे. तसेच या काळात फुलकीड ही रस शोषण कीड कापूस पिकात प्रादुर्भाव करते व कापूस पानातील रस शोषण करून कापूस पिकाची पाने सुरुवातीला पिवळी पडू लागतात व नंतर कापूस पिकाचे पाने लाल होतात. त्यामुळे फुलकीड नियंत्रण करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. फुल किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कापूस पिकात मोठ्या प्रमाणात पातेगळ पाहायला मिळते.

पोळा अमावस्या फवारणी औषध:-

पोळा अमावस्या झाल्या नंतर 72 तासात या कीटकनाशकांची फवारणी करावी. अळी नियंत्रण करण्यासाठी Profex Super 30 मिली प्रती पंप किंव्हा Syngenta Polytrin C 30 मिली प्रती पंप घ्यावे. तसेच कापूस पिकात थ्रीप्स या किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असेल तर Bayer Regent 40 मिली प्रती पंप किंव्हा Bio R 303 20 मिली प्रती पंप घ्यावे. तसेच पातेगल अधिक प्रमाणात होत असेल तर Tata Bahaar टॉनिक 40 मिली प्रती पंप घ्यावे. तसेच थ्रीप्स किडीने प्रादुर्भाव केलेल्या कापूस पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे या फवारणी मध्ये एक चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक घ्यावे…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *