लाडकी बहिण पुढच्या महिन्यात फॉर्म भरल्यास 4500 रू मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल!
लाडकी बहिण:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेत बोलत असताना लाडकी बहिण योजनेचे पैसे दिनांक/ 17 ऑगस्ट रोजी महिलांना दोन हप्त्याचे 3000 रुपये देणार म्हणजे देणारच असा ठाम विश्वास एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत आम्ही देणारे आहोत घेणारे नाही असा इशारा करून विरोधकांना चांगलेच डिवचले आहे. तुमचे अडीच वर्ष सरकार होत तुम्ही का दिले नाही कारण आम्ही देणारे आहोत घेणारे नाहीत असा हल्लाबोल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत केला आहे.
गोर गरीब कुटुंबातील महिलांना खर्च भागवणे कठीण होते, त्यामुळे शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असून प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यावर एकदाच दोन महिन्याचे 3000 रुपये येत्या 17 तारखेला देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे सभेत बोलत असताना म्हणाले ही योजना बंद पडावी त्यासाठी विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. तसेच लाडकी बहिण योजनेच्या विरोधात कोणाला तरी पाठून कोर्टात याचिका करता पण कोर्टाने याचिका फेटाळून लावत या योजनेला कोर्टाने स्थगिती दिली नाही, त्यामुळे कोर्टाचे आभार मानत सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
गोर गरीब कुटुंबातील महिलांना महिन्याला 1500 रुपये दिल्यामुळे महिलांना मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. या योजनेच्या पैशातून गोर गरीब कुटुंबातील महिला त्यांचा मुलांना ड्रेस घेतील, त्यांचा मुलांचा शाळेचा खर्च उचलतील तसेच स्वतःसाठी साड्या घेतील. त्यामुळे ही योजना महिलांसाठी सुरू केली असून वर्षाला 18 हजार रुपये या योजनेतून आमचे सरकार आर्थिक मदत करणार आहे.
तसेच लाडकी बहिण योजनेचा 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले आहे. यानंतरही 31 ऑगस्टपर्यंत 2 कोटी पर्यंत फॉर्म भरल्याचा आकडा जाऊ शकतो, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 1.5 कोटी महिलांना आर्थिक मदत मिळणार असून महिलांचे आर्थिक व्यवहार वाढणार आहे. तसेच महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल त्यामुळे आम्ही विरोधकांचा विरोध होत असून देखील राज्यातील महिलांच्या भविष्यासाठी ही सुरू केली.
दिनांक/ 17 ऑगस्ट नंतर म्हणजे पुढच्या महिन्यात ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करतील त्या महिलांना एकदाच तीन महिन्याचे पैसे 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..