दिनांक/ 20 ऑगस्ट अगोदरच शेतातील कामे करा पुन्हा जोरदार पाऊस येतोय! पंजाब डख..
व्हायरल फार्मिंग : महाराष्ट्राचे लाडके व सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा कर्नाटक व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीचा मॅसेज आहे. दिनांक/ 20 ऑगस्ट अगोदरच शेतातील कामे उरकून घ्या कारण राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाची शक्यता पंजाब डख यांनी वर्तवली आहे.
बंगालच्या खाडीत दोन कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता?
शेतकरी मित्रांनो दिनांक/ 20 ऑगस्ट पासून तर बैल पोळ्या पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. दिनांक/ 20 ऑगस्ट दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये दोन कमी दाबाचे पट्टे सक्रिय होत असून, याचा प्रभाव कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यावर सर्वाधिक होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. दिनांक/ 20 ऑगस्ट नंतरचा पाऊस कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.
मुग उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..
महाराष्ट्र राज्यातील मूग उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज दिनांक/ 13 ऑगस्ट ते दिनांक/ 19 ऑगस्ट पर्यंत राज्यातील वातावरण कोरडे राहणारा असून उन्हाचा तडाखा वाढणार आहे. दिनांक/ 19 ऑगस्ट अगोदरच शेतकऱ्यांनी मूग पिकाची काढणी करून घ्यावी असा सल्ला पंजाब डक यांनी दिला आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांचा मूग काढणीस आला असेल अश्या शेतकऱ्यांनी 19 ऑगस्ट अगोदरच मूक काढून घ्यावा, कारण 20 ऑगस्ट नंतर पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पंजाब डख यांचा अंदाज ठरला तंतोतंत खरा.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काही दिवसांपूर्वी अंदाज जाहीर केला होता. त्यात त्यांनी दिनांक/ 10 ऑगस्ट पासून नाशिक, जळगाव, धुळे, जळगाव जामोद, बुलढाणा, अमरावती आणि अकोला हा परिसर वगळता इतर सर्व राज्यात पाऊस थांबणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानुसार राज्यातील पाऊस थांबलेला आहे व तीव्र सूर्यदर्शन झाले असून गर्मीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. तसेच कोकणात दिनांक/ 17 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरूच राहील असा अंदाज पंजाब डख यांचा अंदाज आहे.