खुशखबर; आता ATM वर मिळणार रेशन धान्य! पाहा काय आहे सत्य?
व्हायरल फार्मिंग :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. Saam TV News युट्युब चॅनेल न दिलेल्या माहितीनुसार गावोगावी रांगेत उभा राहून रेशन घेण्यासाठी धडपडणाऱ्या रेशन कार्ड धारकांना सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे.
आता रेशन कार्ड धारकांना रेशन घेण्यासाठी रांगेत उभा राहण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण ओडिसा राज्यात प्रायोगिक तत्त्वावर ग्रीन डिस्पेन्सिंग मशीन (Grain Dispensing Machine) या मशीन द्वारे रेशन वाटप सुरू आहे.
ओडिसा राज्यात प्रायोगिक तत्त्वावर या मशीन द्वारे धान्यवाटप करण्यात येत असून ATM सारखीच ही मशीन असून या मशीनचे नाव Grain Dispensing Machine (GDM) आहे.
रेशन कार्ड धारकांना शासनामार्फत रेशन धान्य दिले जाते, पण रेशन धान्य गरीब लोकांना मिळे पर्यंत यामध्ये लुटमार होते. त्यामुळे ही लूटमार थांबवण्यासाठी आता ओडिसा राज्यात प्रायोगिक तत्वावर ग्रेन डिस्पेन्सिंग मशीन द्वारे रेशन धान्य वाटप करण्यात येत असून या मशीन द्वारे रेशन कार्ड धारकांना रेशन नंबर व बायोमेट्रिक द्वारे धान्यवाटप केले जाणार आहे.
ग्रीन डिस्पेन्सिंग मशीन 5 मिनिटात 50 किलो धान्य वितरित करू शकते व या मशीन द्वारे रेशन कार्ड धारकांना जलद गतीने वाटप होणार असून रांगेतील गर्दी कमी होणार आहे.
तसेच ग्रेन डिस्पेन्सिंग मशीन द्वारे रेशन कार्ड धारकांना रेशन वितरित करण्यासाठी 24 तास सुविधा मिळणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना 24 तासात कधीही रेशन वितरित करून घेता येणार आहे.
ग्रीन डिस्पेन्सिंग मशीन या मशीन द्वारे प्रायोगिक तत्त्वावर ओडिसा राज्यात रेशन वितरण सुरू झाले असून ही मशीन अजून महाराष्ट्र राज्यात आलेली नाही तसेच ही मशीन महाराष्ट्रात कधी येईल याची आतुरता आता रेशन कार्डधारकांना लागली आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..