सतर्क व्हा राज्यातील फक्त याच जिल्ह्यांना 17 ऑगस्ट पासून धो धो पाऊस! पंजाब डख यांचा नवीन अंदाज

पंजाब डख म्हणतात तातडीचा हवामान अंदाज पुन्हा राज्यात पाऊस सुरू होणार! Panjab Dakh Havaman Andaj Live.

पंजाबराव डख हवामान अंदाज
पंजाब डख म्हणतात तातडीचा हवामान अंदाज पुन्हा राज्यात पाऊस सुरू होणार!

Panjab Dakh Havaman Andaj August: पंजाब डख यांनी त्यांचा गावातील धूळ पेरणी केलेला कापूस प्लॉट दाखवत नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. काय आहे पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज? राज्यात उन्हाचा तडाखा किती दिवस? काय आहे पावसाची परस्तिती सर्व माहिती पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज म्हणून जाहीर केली आहे.

दिनांक/ 18 ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शन:-

पंजाबराव डख साहेब बोलत असताना म्हणाले दिनांक/ 18 ऑगस्ट अगोदरच शेतीचे कामे करून घ्या. दिनांक/ 18 ऑगस्टपर्यंत राज्यात सूर्यदर्शन राहणार असून त्यानंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात सूर्यदर्शन :-

नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात दिनांक/ 14 ऑगस्ट पासून चांगले सुदर्शन राहणार असून दिनांक/ 22 ऑगस्ट पर्यंत हे सूर्यदर्शन राहणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी वेळ मिळेल त्यानुसार शेतीचे कामे उरकून घ्यावीत.

विदर्भ सूर्यदर्शन :

आज दिनांक/ 14 ऑगस्ट पर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पाहायला मिळाला परंतु पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 14 ऑगस्ट पासून विदर्भात सूर्यदर्शन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज पासून सूर्यदर्शन. पूर्व आणि पश्चिम विदर्भात आजपर्यंत जरी पावसाचा जोर कायम राहिला तरी मात्र आजपासून कडक सूर्यदर्शन या परिसरात पाहायला मिळणार आहे.

मराठवाडा सूर्यदर्शन :

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाब डख यांचा सर्वात मोठा सल्ला दिनांक/ 18 ऑगस्ट पर्यंत शेतातील कामे करून घ्या, कारण 18 ऑगस्ट पर्यंतच मराठवाड्यात सूर्यदर्शन राहणार आहे. त्यांनतर 19 ऑगस्ट पासून मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असून मराठवाड्यात मोठा पाऊस होणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

या भागात 18 ऑगस्ट पासूनच पाऊस?

राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक/ 17 ऑगस्ट पासूनच पाऊस येणार असून, या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी शेतीचे कामे 17 ऑगस्ट पर्यंत करून घ्यावेत असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे. दिनांक/ 17 ऑगस्ट पासून सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर भागात 17 ऑगस्ट पासून मोठा पाऊस विजेच्या कडकडाटासह असणार आहे.

दिनांक/ 14 ते 17 ऑगस्ट या भागात पाऊस:-

लातूर जिल्ह्यातील उदगीर, नांदेड, बिलोली, आदिलाबाद आणि यवतमाळ या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच पंजाबराव डख म्हणतात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आजपासून चांगले सुदर्शन पाहायला मिळणार आहे. खूप दिवसापासून विदर्भात जोराचा पाऊस होत असून आता विदर्भातील शेतकऱ्यांना दिनांक/ 22 ऑगस्ट पर्यंत पावसापासून सुटकरा मिळणार आहे. विदर्भात दिनांक/ 22 ऑगस्ट पर्यंत सूर्यदर्शन तर मराठवाडा, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर भागात दिनांक/ 18 ऑगस्ट पासूनच मोठ्या पावसाचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आज पासून चांगले सुदर्शन होणार असून या भागातील शेतकऱ्यांनी शेतीचे कामे फवारणी, वखरणी किंव्हा खत व्यवस्थापन करून घ्यावे असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *