खुशखबर; लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रू झाला जमा! Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000 Rupees Credited in Bank Account..
व्हायरल फार्मिंग :- महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये होत आहे महिलांच्या खात्यावर जमा. ज्या महिलांनी लाडक्या बहिणी योजनेसाठी फॉर्म भरला असेल व त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असेल अशा महिलांना आज दिनांक/ 14 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आज काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana First Installment 3000 Rupees Credited in Bank Account:- महाराष्ट्र राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी खुशखबर दिली आहे. आज दिनांक/ 14 ऑगस्ट 2024 आज पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे. तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलेल्या महिलांना 17 ऑगस्टपर्यंत त्यांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीपासूनच या योजनेसाठी चांगला पुढाकार घेत असून, राज्यातील या योजनेसाठी फॉर्म भरलेल्या पात्र महिलांची आता प्रतीक्षा संपली असून त्यांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्यात येत आहे. काही जिल्ह्यातील आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलेल्या महिलांना आजपासून पैसे जमा करण्यात येत आहे. तुमच्या नातेवाईक महिलांना पैसे बँक खात्यात पडले असेल व तुम्हाला आजुन पैसे जमा झाले नसेल तर घाबरू नका तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर 100 टक्के 17 ऑगस्टपर्यंत तुमचे देखील पैसे जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत 1 कोटी 35 लाख महिलांनी फॉर्म भरले असून त्यात 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांना लवकरात लवकर बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेण्याची आदेश देण्यात आले आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत पैसे पडणार नाही परंतु घाबरून जाऊ नका तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक केल्यानंतर मिळणार आहे.
आज दिनांक/ 14 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत राज्यातील पात्र महिलांना या योजनेअंतर्गत त्यांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे. काही महिलांना आज 14 ऑगस्ट रोजी पैसे जमा झाले असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच ज्या महिलांना या योजनेचे पैसे आज जमा झाले नाही त्यांनी घाबरून जाऊ नका कारण 17 ऑगस्टपर्यंत या योजनेचे पैसे तुम्हालाही मिळणार आहे. परंतु तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यावश्यक आहे. जर नसेल तर दोन दिवसात तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे लागणार आहे तरच तुम्हाला या योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे.