लाडकी बहिण योजना 3000 रू आले नसेल तर लगेच हे काम करा..ladki bahin yojana first installment credited through DBT..
डीबीटी :- जुलै आणि ऑगस्ट 1500 रू एकूण या दोन महिन्याचे 3000 रू लाडक्या बहिणींना त्यांचा आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. काल दिनांक/ 14 ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रू जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तसेच राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे पैसे जमा करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. ज्या महिलांना काल पहिला हप्ता जमा झाला नसेल अश्या महिलांना दिनांक/ 17 ऑगस्ट पर्यंत जमा होणार आहे.
लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिली मोठी आनंदाची बातमी रक्षाबंधन आधीच केले त्यांचे बँक खात्यात पैसे जमा. अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असून काही महिलांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच कोणत्यातरी योजनेचे पैसे जमा झाल्यामुळे महिलांचा आनंद गगनात मावेना झाला आहे.
लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील गोर गरीब महिलांना मोठी आर्थिक मदत होणार असून पैसे जमा होताच त्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आले आहे. राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मोठा आर्थिक हातभार होणार असून रक्षाबंधन आनंदाचे जाणार आहे.
तुमचे पैसे जमा झाले का?
राज्यातील लाडक्या बहिणींनो अनेक पात्र महिलांचे पैसे जमा झाले आहे. हे पैसे डीबीटी मार्फत जमा करण्यात येत असून, पात्र महिलांचे आधार बँक सोबत लिंक असणे बंधनकारक आहे. ज्या महिलांचे आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर महिलांनी तत्काळ लिंक करून घेण्याचे आवाहन तुमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी करत आहे.
लाडकी बहिण योजना:-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच गोर गरीब कुटुंबातील महिलांच्या हितासाठी एक अनोखी योजना आणली असून, या योजनेचा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे 3000 रू पहिला हप्ता जमा देखील करण्यात येत आहे. लाडकी बहिण योजना ही विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच सुरू केल्यामुळे विरोधकांनी या योजनेवर अनेक टीका केल्या आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी ही योजना यशस्वी करून दाखवली आहे. तसेच पहिला हप्ता देखील जमा होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे:-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे पैसे जमा करण्याचा निर्धार पूर्ण केला असून पैसे जमा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी विरोधकांनी अनेक विरोध केला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो सावत्र भावा पासून सावध रहा यांना तुमची योजना बंद करायची आहे असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना म्हणाले महायुतीचे सरकार देणारे आहे घेणारे नाही त्यामुळे पहिला हप्ता जमा करायला सुरुवात केली आहे. अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहे. दिनांक/ 17 ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे.
लाडकी बहिण योजना पहिला हप्ता तुम्हाला मिळणार का?
लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता 3000 रू ज्या महिलांनी आधार बँक खात्याशी लिंक केले आहे, अश्या महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे. तसेच ज्या महिलांचे बँक खाते आधार सोबत लिंक नाही अश्या महिलांनी आधार बँक खात्याशी लिंक केल्यावर त्यांचे पैसे मिळतील..