पंजाब डख म्हणतात आभाळाचा रंग बद्दला राज्यात मोठा पाऊस येणार! पंजाब डख हवामान अंदाज…
Panjab Dakh:- नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीची बातमी आहे. आभाळाचा रंग झाला तांबडा निसर्गाने दिला आहे पावसाचा अंदाज. हवामान अभ्यासक पंजाब डख नेहमी सांगतात निसर्ग आपल्याला हवामान अंदाज सांगत असतो तो फक्त शेतकऱ्यांना वळखता आला पाहिजे. निसर्गात अश्या अनेक गोष्टी आहे ज्या पावसाच्या निगडित आहे. जसे की आभाळाचा रंग बदलून तांबडा होणे, लाईट शेजरी किडे जमा होणे, गर्मी वाढणे आणि ड्रॅगन फ्लाय ही किड बाहेर उडताने दिसणे अश्या अनेक निसर्गातील गोष्टी शेतकऱ्यांना हवामान अंदाज सांगत असतात असे पंजाब डख यांनी सांगितले आहे.
पंजाब डख म्हणतात ज्या भागात दिवस मावळत्या वेळी आभाळाचा रंग बदलून तांबडा होतो, त्या भागात दोन दिवसात पाऊस येतो असा अनोखा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे. पावसाळ्यात ज्या भागात दिवस मावळत्या वेळी आभाळाचा रंग बदलून तांबडा होतो त्या त्या भागात 72 तासात पाऊस पडतो असा अंदाज निसर्गच सांगून जातो असे डख म्हणतात.
उत्तर महाराष्ट्रात पिकाला पाण्याची गरज पडू शकते कारण दिनांक/ 14 ते 22 ऑगस्ट दरम्यान उत्तर महाराष्ट्रात तीव्र गर्मी व सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे. तसेच मराठवाड्यात दिनांक/ 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण व स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडणार आहे. विशेष ज्या भागात दिवस मावळत्या वेळी आभाळाचा रंग तांबडा होतो त्या भागात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे. कारण सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या भागातील घाट माथ्यावरील परिसरात अगोदरच मोठे पाऊस झाले असून पुन्हा 18 ऑगस्ट पासून मोठ्या पावसाचा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. तसेच पूर परिस्थिती येऊ शकते अशी शक्यता आहे.
मराठवाड्यात दिनांक/ 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान ढगाळ वातावरण, सूर्यदर्शन, तीव्र गर्मी आणि रात्रीचा पाऊस अशा स्वरूपाचे वातावरण या तीन दिवसात राहणार आहे. मराठवाड्यात रात्री काही भागात अर्धा व एक तासाचा पाऊस पडणार आहे. तसेच हा पाऊस तुरळक ठिकाणी पडणार असून या पावसाची शक्यता सर्वदूर नाही असे पंजाबराव डख सांगतात.
विदर्भातील शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांचा तातडीचा संदेश आहे. विदर्भातील भागात 18 ऑगस्ट पासून पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी मूग काढणीस आला असेल तर काढून घ्यावे असे पंजाबराव डख यांचा सल्ला आहे धन्यवाद…