Vihir Anudan Yojana 2024 ; आरे वा आता विहीर अनुदान 5 लाख रुपये मिळणार! Vihir Anudan Yojana in Maharashtra 2024 New Update…
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी साठा रहावा त्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते. विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान दिले जाते त्या अनुदानात आता वाढ करण्यात आली असून, विहित खोदण्यासाठी 5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
कारण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या हेतूने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सिंचन विहिरीच्या अनुदानाची आर्थिक मर्यादा वाढीबाबत राज्य सरकारने दिनांक/ 05 ऑगस्ट 2024 रोजी जीआर निर्गमित केला आहे.
सन 2022 मध्ये विहिरीच्या अनुदानात वाढ करून विहीर खोदण्यासाठी राज्य सरकारने 4 लाख रुपये अनुदान दिले आहे. त्यामुळे सिंचन विहिरीच्या कामात चांगलीच गती वाढली असून, मागील तीन वर्षात म्हणजे सन 2021-22 ते जुन 2024 पर्यंत 29 हजार 490 सिंचन विहिरीचे कामे पूर्ण मार्गी लागले असून 1 लाख 55 हजार 164 इतक्या सिंचन विहिरीचे कामे सुरू असून प्रगतीपथावर आहेत. परंतु मजुरांची कमतरता तसेच मजुरांची वाढलेली मजून लक्षात घेऊन सिंचन विहीर अनुदानात वाढ करण्यात येत आहे.
मनरेगा मजुरी दरात वाढ?
दिनांक/ 01 एप्रिल 2024 पासून केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना प्रती दीन 297 रुपये मजुरी दर केला आहे. त्यामुळे रकमेत वाढ केली असून सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजे रक्कम 4 लाख 99 हजार 403 रुपये इतकी आहे. त्यामुळे 2023 पर्यंत सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी 4 लाख रुपये अनुदान दिले जात होते. परंतु आता मजुरी खर्च मजुरांची कमतरता सर्व गोष्टी लक्षात घेऊन दिनांक/ 01 एप्रिल पासून अनुदानात वाढ करण्यात आली असून 5 लाख करण्यात आली आहे. असा शासन निर्णय जीआर देखील दिनांक/ 05 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित झाला आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. तरी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ भेट द्यावी व अधिक माहिती घ्यावी.
या योजनेचा हेतू काय?
राज्यातील प्रत्येक गोर गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांनी अनुदानातून विहीर खोदण्यासाठी प्रोत्साहन देणे. तसेच राज्यातील प्रत्येक कुटुंबांना लखपती करण्याचे उद्दिष्ट या योजनेतून राज्य सरकारचे आहे. त्याचबरोबर विहीर खोदण्यासाठी मनरेगा अंतर्गत गरीब कुटुंबातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे या योजनेचा हेतू आहे. प्रत्येक कुटुंबातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या योजनेतून आहे.
विहीर अनुदान योजनेचा फायदा?
1- विहित अनुदानाच्या रकमेत वाढ केल्यामुळे विहीर खोदण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
2- विहीर अनुदानाच्या रकमेतून विहीर खोदण्यासाठी लागणारा खर्च वसूल होणार आहे.
3- मनरेगा अंतर्गत मजुरांचा रोज वाढवला असून, त्यांना कुटुंब चालवण्यासाठी हातभार होणार आहे.
4- प्रत्येक कुटुंबातील शेतकऱ्यांना लखपती बनवण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.
5- शेती उत्पादन वाढीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.