खुशखबर; सोयाबीन कापूस अनुदान लवकरच शेतकऱ्यांचा बँक खात्यात येणार! डीबीटी प्रक्रिया सुरू..
Bhavanatr Yojana 2024: राज्यातील सोयाबीन व कापुस अनुदान निगडित सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली असून, सोयाबीन व कापुस अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांचा बँक खात्यात वाटप करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र बँक खाते उघडण्यास मान्यता दिली असून, दिनांक/ 14 ऑगस्ट 2024 रोजी जीआर निर्गमित केला आहे.
राज्य शासनाच्या वतीने 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापुस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य अनुदान वितरित करण्यासाठी “स्टेट बँक ऑफ इंडिया” या राष्ट्रीयकृत बँकेत आयुक्त (कृषी) यांचा नावे बचत खाते उघडण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांचा बँक खात्यात डीबीटी मार्फत या अनुदानाची रक्कम जमा होणार असून, शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
बचत खाते उघडण्यासाठी राज्य शासनाने दिली मान्यता..
सोयाबीन व कापुस अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांचा बँक खात्यात वितरित करण्यासाठी राज्य शासनाने आयुक्त (कृषी) यांचा नावाने बचत खते उघडण्यासाठी मान्यता दिली असून, या खात्यात अनुदानाची रक्कम एकूण 4194.68 कोटी रुपये क्रेडिट करून शेतकऱ्यांचा थेट आधार लिंक बँक खात्यात डीबीटी मार्फत अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
अनुदानाची रक्कम किती?
सर्व प्रथम या अनुदाचा लाभ घेण्यासाठी 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी केलेली असावी अशी महत्वाची आट घातली आहे. तसेच या अनुदानाची रक्कम डीबीटी मार्फत थेट बँक खात्यात जमा होणार असून तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे. तसेच या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा करण्यासाठी कृषी विभागाकडून गावोगावी मोहीम राबवण्यात येत असून आधार माहिती वापरण्यासाठी फॉर्म भरून घेतले जात आहे.
वर्ष 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 20 गुंठे पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 1000 रुपये तर 20 गुंठे पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादित 5000 रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..