खुशखबर; लाडकी बहिण अपात्र महिलांसाठी मोठा निर्णय त्यांनाही मिळणार लाभ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.. अपात्र महिलांना लाभ मिळविण्यासाठी हे काम करावे लागणार..
Mazi Ladki Bahin Yojana : आज दिनांक/ 16 ऑगस्ट राज्यातील 80 लाख पेक्षाही अधिक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आलेले आहे. दिनांक/ 14 ऑगस्ट पासून सुरू झालेली ही प्रक्रिया 17 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या महिलांसाठी महिला व बालविकास विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेस राज्यातील महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
तसेच राज्यातील 1.5 कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. पात्र झालेल्या महिलांच्या खात्यात दिनांक/ 14 ऑगस्ट पासून पहिला हप्ता 3000 रुपये देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. थेट दिनांक/ 17 ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून, या तारखेपर्यंत महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा केले जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार..
लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये थेट बँक खात्यात जमा झाल्यानंतर महिलांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे काय म्हणतात:-
महिला व बालविकास विभागाच्या मार्फत सुरू केलेली लाडकी बहिण योजना ही एक अत्यंत लाभदायक योजना असून, या योजनेस राज्यातील महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आता पर्यंत या योजनेसाठी 1.5 कोटी पेक्षा अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. तसेच 80 लाख पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे 3000 रुपये जमा केले आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया 17 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतात पाहा..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता दिनांक/ 14 ऑगस्ट पासून जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळाला आहे. ट्रायल न करता महिलांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा केली. तसेच हे पैसे 17 ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांच्या खात्यावर जमा होत राहणार आहे. एकनाथ शिंदे म्हणतात ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे, परंतु पैसे मिळाले नाही अश्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा करण्यात येणार आहे.
अपात्र असलेल्या महिलांना पात्र करण्यासाठी त्यांचे कागदपत्रे घेतले जाईल व त्याचे व्हेरिफिकेशन करून त्या महिलांनाही पात्र करून लाभ दिला जाईल असे एकनाथ शिंदे बोलले..