Maharashtra Rain; आज 16 ऑगस्ट पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता! IMD Alert

Maharashtra Rain Update; राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे! Havaman Andaj Latest New Update…

maharashtra havaman andaj new update
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता..

Weather Forecast : आज दिनांक/ 16 ऑगस्ट दुपारचे 5 वाजले असून, आजपासून पुढील 5 दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप मिळाली असून, शेतकरी बांधवांनी शेतीचे कामे आटोक्यात आणली आहे. तसेच आजूनही विदर्भ आणि कोकण सोडता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचे प्रमाण कमीच आहे.

मराठवाड्यातील काही भागात सोयाबीन व कापुस पिकाला पाण्याची गरज भासत आहे. मराठवाड्यातील शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत असून, त्यातच हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे.

आज दिनांक/ 16 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार आहे. आज विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आजपासून 20 ऑगस्ट पर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

तसेच मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारीक थेंबाचा हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असून, अनेक भागात विजेच्या कडकडाटासह मध्यम व हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच 30 ते 40 किलो मीटर प्रती घंटा वाऱ्याचा ताशी वेग राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

five days imd alert
अधिक माहितीसाठी इथे पाहा..

तसेच कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

आज दिनांक/ 16 ऑगस्ट रोजी खानदेशातील नंदुरबार, धूळ, जळगाव व नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. तर नगर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *