गुड न्यूज! लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर राज्य सरकारने दिली गुड न्यूज? लाखो महिलांना होणार फायदा..
Ladki Bahin Yojana Good News :-
राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर सन्मान निधी जमा करण्यात आलेला आहे. लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली असून या योजनेतून प्रती वर्ष पात्र असलेल्या महिलांना 18000 रुपये देण्यात येणार आहे. वर्षाला 18000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून पहिला हप्ता एकदाच दोन महिन्याचे 3000 रुपये पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.
तसेच आज दिनांक/ 17 ऑगस्ट असून आजही पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे. ज्या महिलांचे बँक खाते आधार सोबत लिंक आहे अशा महिलांच्या खात्यावर आज दिनांक/ 17 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता 3000 रुपये वितरित होणार आहे.
लाडकी बहिण योजनेचे फायदे?
आर्थिक सहाय्य :- लाडकी बहिण योजनेतून राज्यातील पात्र महिलांना प्रती महिना 1500 रुपये आर्थिक सहाय्य मिळणार. या सन्मान निधीतून महिला स्वतःचा गरजा पूर्ण करणार.
मानसिक त्रास कमी होणार :- अनेक महिलांना हॉस्पिटल, घरखर्च किंव्हा मुलांचा शाळेचा खर्च भागवण्यासाठी पैसे उसने किंव्हा व्याजाने घ्यावे लागतात, त्यामुळे राज्यातील महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. या योजनेतून महिन्याला 1500 रुपये दिले जाणार असून महिलांचा मानसिक त्रास कमी होणार.
पहिला हप्ता वितरण शेवटची तारीख:-
आज दिनांक/ 17 ऑगस्ट असून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये वितरित करण्यासाठी ही शेवटची तारीख आहे. मागील चार दिवसापासून लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे. आज पहिला हप्ता वितरित करण्यासाठी शेवटची तारीख असून, पात्र महिलांचा खात्यावर आज पहिला हप्ता 3000 रुपये वितरित केला जाणार आहे.
महिलांसाठी राज्य सरकारने दिली सर्वात मोठी गुड न्यूज?
आज दिनांक/ 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान ज्या महिला फॉर्म भरतील त्यांनाही लाभ मिळणार असून तीन महिन्याचे एकदाच 4500 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. तसेच लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख सांगण्यात आली होती. पण 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांना फॉर्म भरणे शक्य होत नाही, अशा महिलांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज राज्य सरकारने दिलेली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुड न्यूज दिली असून, दिनांक/ 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख जरी सांगितली असली, तरी 31 ऑगस्ट नंतर ज्या महिला फॉर्म भरतील त्यांचाही फॉर्म ग्राह्य धरला जाईल व त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांचा फायदा होणार असून दिनांक/ 31 ऑगस्ट नंतरही तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार असून, या योजनेचा लाभ ही मिळणार आहे.