सर्वात मोठी गुड न्यूज! नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच जमा होणार.. GR आला आहे.

सर्वात मोठी गुड न्यूज! नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच जमा होणार.. GR आला आहे.

नमो शेतकऱ्यांच्या चौथा हप्ता लवकरच मिळणार निधी मंजूर
सर्वात मोठी गुड न्यूज! नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच जमा होणार.. GR आला आहे.

Namo Shetkari Yojana :- नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी नवीन अपडेट आली आहे. आज दिनांक/ 20 ऑगस्ट 2024 रोजी नवीन जीआर (GR) निर्गमित करण्यात आला आहे. नमो शेतकरी चौथी हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे, लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे.

पिएम किसान योजनेचा धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यात वितरित केले जातात. प्रत्येक चार महिन्याचा अंतराने 2000 रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून बँक खात्यात जमा केले जातात.

नमो शेतकरी योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हप्ते मिळाले असून चौथा हप्ता लवकरच मिळणार आहे. पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये सन्मान निधी दिला जातो तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधीतून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये लाभ मिळतो.

लाखो शेतकऱ्यांची प्रतिक्ष संपणार :-

राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथी हप्त्याची वाट पाहत असून, आता त्या शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथी हप्त्याचे मानधन जमा होणार आहे अशी सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली आहे.

योजना बंद झाल्याची पारावर चर्चा :-

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळण्यासाठी उशीर झाला असून ही योजना बंद पडली अशी चर्चा चालू होती त्यातच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी खुशखबर दिले आहे. नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता प्रक्रिया सुरू :-

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने पहिले पाऊल उचलले असून आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी जीआर निर्गमित केला आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी 2041.25 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20.41 कोटी, असा एकूण 2061.66 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

चौथा आणि पाचवा हप्ता एकदाच मिळणार का :-

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देण्यासाठी उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती, चौथा आणि पाचवा हप्ता एकदाच मिळणार का? परंतु हा निधी फक्त चौथ्या हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर केला असून, शेतकऱ्यांना फक्त चौथा हप्ता मिळणार आहे. म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार :-

नमो शेतकरी योजनेचा प्राप्त वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु तो हप्ता वितरित करण्यासाठी तारीख फिक्स झालेली नाही. राज्य शासनाने नवीन अपडेट दिल्यानंतर तुम्हाला आपण तारीख कळवणार आहे. परंतु लवकरच हा फक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *