Panjab Dakh : सप्टेंबरच्या शेवटी पावसाचा जोर वसरणार सोयाबीन काढणी करून घ्या दिनांक 6 ते 9 ऑक्टोंबर पाऊस पुन्हा येतोय? पंजाब डख हवामान अंदाज.

Panjab Dakh : सप्टेंबरच्या शेवटी पावसाचा जोर वसरणार सोयाबीन काढणी करून घ्या दिनांक 6 ते 9 ऑक्टोंबर पाऊस पुन्हा येतोय? पंजाब डख हवामान अंदाज.

next one week havaman andaj

पंजाब डख यांनी वर्तवलेल्या हवामान माहितीनुसार राज्यात 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर या दरम्यान राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. नवरात्र उत्सवात सुरुवातीला पावसाची विश्रांती राहणार आहे. परंतु 6, 7, 8 आणि 9  ऑक्टोंबर या कालावधीत राज्यात पाऊस होणार असल्याचं पंजाब डख यांनी सांगितलं आहे. दिनांक 29 सप्टेंबर पासून ते 5 ऑक्टोंबर अगोदर सोयाबीन काढणी करून घेण्याचा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.

Panjabrao Dakh : सप्टेंबर महिन्याच्या शेवटी 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या आठवडाभरात राज्यात भाग बदलत विखुरलेला पाऊस होणार आहे. पावसाने आठवडाभर विश्रांती घेण्याचं ठेरवल आहे. दिनांक 21 ते 27 सप्टेंबर या कालावधीत राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. परंतु, सोयाबीन काढण्यासाठी 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर या कालावधीत पावसानं विश्रांती घ्यायचं ठरवलं आहे.

पंजाब डख यांचा 21 सप्टेंबर रोजी चा हवामान अंदाज खरोखर खरा ठरला आहे. 21 सप्टेंबर पासून राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचं भाकीत पंजाब डख यांनी वर्तवल होत. 21 सप्टेंबर अगोदरच विदर्भ आणि मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी करून घ्यावी कारण 21 सप्टेंबर पासून राज्यात मुसळधार पाऊस असल्याचं त्यांनी सांगितलं होत. पंजाब डख यांचा हा अंदाज खरोखर खरा ठरला असून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान वाचले आहे.

भाग बदलत पावसाचा अंदाज?

28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर या आठवडाभरात राज्यात पावसाचा रोज कमी होणार आहे. 5 ऑक्टोंबर सर्वदूर मुसळधार पावसाचा अंदाज नसून विखुरलेला पाऊस होणार आहे.

सोयाबीन काढणीसाठी योग्य वेळ

महाराष्ट्रात 5 ऑक्टोंबर पर्यंत सर्वदूर मोठ्या पावसाचा अंदाज नाही. 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर या कालावधीत राज्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी करून घ्यावी असा महत्त्वाचा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम

30 सप्टेंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, मुंबई आणि जळगाव या भागात पावसाचा मुक्काम सप्टेंबरच्या शेवटपर्यंत कायम आहे. 1 ऑक्टोंबर नंतर उत्तर महाराष्ट्रात सूर्यदर्शन होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 1 ऑक्टोंबर पासून सोयाबीन काढणीसाठी योग्य वेळ आहे.

सोयाबीन काढणी व काळजी

5 ऑक्टोंबर पर्यंत सोयाबीन काढणीसाठी योग्य वेळ आहे. तुम्ही तुमची सोयाबीन काढणी करून घ्या. परंतु सोयाबीन काढणी केल्यानंतर जस सूर्यदर्शन मिळेल तशी सोयाबीन वाळून घ्या व दुपार नंतर सोयाबीन वळाही घालून झाकून ठेवण्याची तयारी करा. कारण सोयाबीन वाळून वळाही घातल्यास सोयाबीन खराब होणार नाही.

ऑक्टोंबर महिन्यात मी पुन्हा येतोय?

सोयाबीन काढणी 5 ऑक्टोंबर पर्यंत करून घ्या. 6, 7, 8 आणि 9 ऑक्टोंबर या कालावधीत परत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 5 ऑक्टोंबर पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी करून घेण्याचा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.

जाळे धुई काय सांगते?

पंजाब डख म्हणतात आपला निसर्ग संगती पाऊस कधी निघून जाणार आहे. 1 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर या कालावधीत सकाळी धुई पडते. तसेच, सकाळी सकाळी कापसाच्या झाडावर, केळीच्या पानावर जाळी धुई पडते. निसर्ग सांगत असतो की जाळी धुई दिसून आल्यापासून बरोबर 12 दिवसांनी पाऊस निघून जातो असे संकेत आपल्याला निसर्ग देत असल्याचं पंजाब डख यांनी सांगितलं आहे.

दिनांक 6, 7, 8 आणि 9 ऑक्टोंबर या कालावधीत राज्यात पावसाचा अंदाज आहे. तसेच, 23, 24 आणि 25 ऑक्टोंबर या कालावधीत राज्यात पावसाचा अंदाज आहे. दिनांक 5 नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होणार आहे. थंडीचे वातावरण पाहता हरभरा पिकाची व्यवस्थापन करावे असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *