जमिनीचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी पिकांची फेरपालट गरजेची…
Crop rotation:- पिकांची फेरपालट शेतकरी मित्रांनो दर वर्षी तुम्ही एकाच पिकाची लागवड सतत एकाच जमिनीवर करत असाल तर त्या जमिनीपासून पाहिजे तेवढं उत्पादन मिळत नाही. कारण सतत एकच पीक एकाच जमिनीवर घेत असल्यामुळे तुमची जमीन कडक होऊन जमिनीतील सुपीकता कमी होते त्यामुळे शेतकरी बांधवांनी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे.
तसेच कापूस हे पीक सतत दरवर्षी घेत असाल तर कापूस पिकाच्या मुळा जमिनीत खोल जातात आणि त्याच खोलीतील वारंवार अन्नद्रव्य शोषण करतात त्यामुळे सतत कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
त्यामुळे उत्पादन वाढीसाठी दोन वर्षांतून एकदातरी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे म्हणजे गेल्या वर्षी जर तुम्ही कापूस पिकाची लागवड केली असेल तर या वर्षी कापूस पिकाला पर्याय पीक म्हणून खरीप हंगामात सोयाबीन किंव्हा तूर पिकाची लागवड करावी.
कारण सोयाबीन व तूर पिकाच्या मुळावर जिवाणूंच्या गाठी असतात व या गाठी सतत हवेतील नत्र शोषण करून जमिनीत साठवतात त्यामुळे खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीने दिसून येतो.
तसेच राज्यातील बहुतांश शेतकरी वर्षांनी वर्ष ऊस या पिकाची लागवड करतात त्यामुळे अधिक प्रमाणात वापरलेले खत आणि सतत उसाला देणारे पाणी जमिनीतील सुपीकता कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे.
कापूस व ऊस पिकाला पर्याय पीक म्हणून तुम्ही खरीप हंगामात सोयाबीन किंव्हा तूर या कडधान्य पिकाची लागवड करू शकता.
सोयाबीन पिकाची लागवड केल्यामुळे कमी दिवसात तुमच्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थ व नत्र पुरवठा वाढणार आहे. तसेच कमी दिवसात भरघोस उत्पादन ही मिळणार आहे व जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे पीक फायदेशीर ठरणार आहे.
शेतकरी मित्रांनो वर्षांनी वर्ष देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढीसाठी जमिनीत रासायनिक खतांचा वापर करत आहे. परंतु अधिक प्रमाणात रासायनिक खतांचा वापर जमिनीचे आरोग्य बिगडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर नियंत्रणात ठेऊन पिकांची फेरपालट केल्यास कमी खर्चात उत्पादन वाढणार आहे.
त्यामुळे कोणता ही खर्च न करता जमिनीचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी व उत्पादन वाढीच्या दृष्टीने सतत सतत घेत असलेले पीक आता थांबून पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे धन्यवाद…