उन्हाळी मूग लागवड करण्यासाठी सुधारित वाणांची निवड:-
शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील हरभरा पीक काढणी केल्यानंतर शेतकरी बांधवांना पहिली प्रश्न पडतो की आता उन्हाळी हंगामात कमी दिवसात येणाऱ्या कोणत्या पिकाची लागवड करावी. रब्बी हंगामातील पीक काढणी केल्यानंतर जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही उन्हाळी हंगामात मूग या पिकाची लागवड करू शकता. कमी दिवसात म्हणजे फक्त 60 ते 65 दिवसात येणार पीक आहे. उन्हाळी हंगामातील तापमान मुगाच्या वाढीसाठी चांगले मानवते परंतु उन्हाळी हंगामात योग्य वाणाची निवड करणे गरजेचे आहे. (Unhali mung lagwad)
उन्हाळी मूग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित आणि आधुनिक उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करावी खालील माहिती सविस्तर वाचा..
उन्हाळी मूग टॉप 6 वान:-
1- कोपरगाव मूग:-
– या वाणाची कालावधी फक्त 60 ते 65 दिवसाची आहे म्हणजे खूप कमी दिवसात हा वान काढणीस येतो.
– या वाणाचे दाने हिरवेगार व चमकदार आहे त्यामुळे भाव देखील चांगला मिळतो.
– कोपरगाव हा वान उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस केलेला आहे.
– उन्हाळी हंगामात भरघोस उत्पादन देनारा वान आहे.
– या वाणाचे हेक्टरी उत्पादन 10 ते 12 क्विंटल इतके आहे.
– महाराष्ट्र, गुजरात व मध्ये प्रदेश राज्यात लागवडीसाठी शिफारस केलेला वान आहे.
2- बी एम 2002-1 मूग वान:-
– शेतकरी मित्रांनो हा वान मध्येम कालावधीचा वान आहे साधारण 65 ते 75 दिवसात काढणीस येणारा वान आहे.
– या वाणाचे दाने टपोरे आहे.
– या वाणाची शेंग लांब व वजनदार आहे.
– अधिक उत्पादन देणारा वान आहे साधारण हेक्टरी 14 क्विंटल उत्पादन हा वान देतो.
– पावडरी भुरी रोगास हा वान प्रतिकारक्षम आहे.
– एकाच वेळी काढणीस येणारा वान आहे.
– महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी शिफारस केलेला वान आहे.
3- पी.के.व्ही ग्रीन गोल्ड मूग:-
– अधिक कालावधीचा वान आहे हा वान काढणीस 70 ते 75 दिवसात येतो.
– विदर्भात लागवडीसाठी शिफारस केली आहे.
– खरीप व उन्हाळी हंगामात लागवडीसाठी योग्य वान आहे.
– या वाणाचे दाने मध्येम आकाराचे आसुन अधिक उत्पादन देणारा वान आहे.
– भुरी या बुरशीजन्य रोगास प्रतिकारक्षम आहे.
– हेक्टरी उत्पादन 12 क्विंटल पर्यंत मिळते.
– एकच वेळी काढणीस येणारा वान आहे.
4- वैभव मूग:-
– वैभव हा वान मध्येम कालावधीचा असून 70 ते 75 दिवसात काढणीस येतो.
– खरीप व उन्हाळी अश्या दोन्ही हंगामासाठी शिफारस केलेला वान आहे.
– हिरवे दाने व अधिक उत्पादन देणारा वान.
– भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे.
– हेक्टरी उत्पादन सर्वाधिक आहे 15 क्विंटल.
5- फुले चेतक मूग:-
– महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी शिफारस केलेला वान आहे.
– या वाणाचे दाने टपोरे आहे.
– या वाणाची शेंग टपोरी आणि लांब आहे.
– अधिक उत्पादन देणारा वान आहे हेक्टरी उत्पादन 12 ते 15 क्विंटल इतके आहे.
– भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे.
6- फुले सुवर्ण मूग:-
– हा वान लवकर काढणीस येणारा वान आहे.
– या वाणाची कालावधी फक्त 65 दिवस आहे.
– त्यामुळे उशिरा पेरणी साठी उत्तम वान आहे.
– दाण्यांचा आकार मध्येम टपोरा.
– भुरी रोग प्रतिकारक वान आहे.
– हेक्टरी उत्पादन कमी म्हणजे 8 ते 10 क्विंटल फक्त.
शेतकरी मित्रांनो नक्कीच माहिती आवडली असेल शेअर करा धन्यवाद…