हरभरा घाटे भरण्यासाठी शेवटची फवारणी…
शेतकरी मित्रांनो हरभरा उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकाच्या घाटे अवस्थेत शेवटची फवारणी खूप महत्वाची आहे कारण हरभरा पिकाच्या घाटे अवस्थेत पॉड बोरर म्हणजे घाटे आळी ही आळी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते या किडच योग्य वेळी नियंत्रण कारण खूप गरजेचे आहे तरच आपण हरभरा पिकात होणार आर्थिक नुकसान टाळू शकतो हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेतले पाहिजे.
हरभरा हे पीक साधारण 95 ते 100 दिवसाचे पीक आहे त्यामुळे या पिकाला साधारण 3 फवरण्याची आवश्यकता पडू शकते..
पहिली फवारणी ही हरभरा पिकाच्या फुटवे अवस्थेत म्हणजे पेरणी पासून साधारण 25 दिवसाच्या दरम्यान करावी तरच आपल्या हरभरा पिकात भरघोस फुटवा लागून उत्पादनात वाढ होते.
दुसरी फवारणी ही हरभरा पिकाच्या फुल अवस्थेत म्हणजे पेरणी पासून साधारण 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान करावी या फवारणी मुळे हरभरा पिकात भरघोस फुल धारणा होते तसेच फुलगळ कमी होऊन उत्पादनात मोठी वाढ होते हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेतले पाहिजे.
तिसरी फवारणी ही पेरणी पासून साधारण 70 ते 75 दिवसाच्या दरम्यान करावी ही फवारणी घाट्यात दाने भरण्यासाठी महत्वाची ठरते.
आता आपण हरभरा फुटवे वाढवण्यासाठी पहिली फवारणी कोणती आणि कधी करावी त्या बद्दल संपूर्ण माहिती बघू.
हरभरा पहिली फवारणी पेरणी पासून 25 दिवसांनी करावी त्यात एक आळी नाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक व एक विद्राव्य खाते घेणे गरजेचे आहे..
आळी नाशक –
Emamectine benzoate 10 ग्राम प्रति पंप किंव्हा हमला 30 मिली प्रती पंप
बुरशीनाशक –
साफ बुरशीनाशक 40 ग्राम प्रति पंप किंव्हा रोको बुरशीनाशक 40 ग्राम प्रति पंप
टॉनिक –
बायोविटा एक्ष 40 मिली प्रती पंप किंव्हा इसाबियन टॉनिक 40 मिली प्रती पंप घ्यावे
विद्राव्य खत –
12-61-00 विद्राव्य खत 100 ग्राम प्रति पंप
अश्या पद्धतीने हरभरा पहिली फवारणी करावी.
हरभरा दुसरी चना शेवटची फवारणी फवारणी
हरभरा पिकाच्या फुल अवस्थेत फुल संख्या वाढवण्यासाठी ही फवारणी करावी
त्यात आळीनाशक एमामेक्टिन 10 ग्राम प्रति पंप किंव्हा एमप्लिगो (Ampligo) 10 मिली प्रती पंप घ्यावे
त्याच बरोबर बुरशीनाशक साफ 40 ग्राम प्रति पंप घ्यावे टॉनिक घेत अस्तांनी फुल अवस्थेत टाटा बहार 40 मिली प्रती पंप व विद्राव्य खत 00-52-34 100 ग्राम किंव्हा फ्लोअरिंग स्पेशल (Flowering special) 100 ग्राम प्रति पंप घेऊन अशी फवारणी करावी.
हरभरा शेवटची व तिसरी फवारणी-
हरभरा शेवटची फवारणी हरभरा पिकाच्या घाते अवस्थेत घटे भरण्यासाठी करावी या फवारणी मध्ये आळीनाशक कोराजेन (Coragen) 6 मिली प्रती पंप त्याच बरोबर 13-00-45 100 ग्राम किंव्हा 00-00-50 100 ग्राम प्रति पंप घ्यावे जर वातावरण ढगाळ असेल तर एक चांगल्या दर्जेच बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता.
शेतकरी मित्रांनो अश्या पद्धतीने जर तुम्ही हरभरा पिकाच्या अवस्थे नुसार फवारणी केल्या तर खूप मोठा फायदा तुम्हाला दिसून येणारं आहे..