मागील 7 दिवसापासून जालना तूर बाजार भाव 10 हजार

Tur market jalna- जालना बाजार समिती मध्ये तुरीला 10 हजाराचा भाव:-

Jalna tur market
Tur market jalna- जालना बाजार समिती मध्ये तुरीला 10 हजाराचा भाव:-

शेतकरी मित्रांनो मागील एक आठवड्यापासून म्हणजे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान जालना बाजार समिती मध्ये तूर बाजार भावात काय चढ उतार झाला आहे त्या बद्दल सविस्तर माहिती घेऊ.

मित्रांनो यंदा पावसाअभावी तूर पिकाची लागवड हंगामाच्या सुरवातीला उशिरा झाली त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात तूर पीक फुल अवस्थेत असताना तूर पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला व तुरीचे उत्पादन ही घटेल तसेच यंदा तुरीचा साठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे तुरीचे बाजार भाव उच्चांकी पातळीवर दिसून येत आहे.

दिनांक. 27/01/2024 रोजी जालना बाजार समिती मध्ये लाल तुरीची एकूण आवक 388 क्विंटल ची होती तर या तुरीला किमान दर 9100 रुपये तर कमाल दर 9400 रुपये प्रति क्विंटल तसेच सर्वसाधारण दर 10051 रुपये मिळाला होता.

त्यानंतर दिनांक. 29/01/2024 रोजी जालना बाजार समिती मध्ये पांढऱ्या रंगाच्या तुरीची एकूण आवक 2095 क्विंटल ची असून किमान दर 7500 रुपये तर कमाल दर 10591 रुपये प्रति क्विंटल तसेच सर्वसाधारण दर 10 हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

व याच जालना बाजार समिती मध्ये लाल तुरीची एकूण आवक 472 क्विंटल ची असून किमान दर 9700 रुपये तर कमाल दर 10470 रुपये प्रति क्विंटल तसेच सर्वसाधारण दर 9900 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

दिनांक.30/01/2024 रोजी जालना बाजार समिती मध्ये पांढऱ्या तुरीची एकूण आवक 2125 क्विंटल ची झाली असून किमान दर 8900 रुपये तर कमाल दर 10501 रुपये प्रति क्विंटल तसेच सर्वसाधारण दर 10000 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

व याच दिवसी जालना बाजार समिती मध्ये लाल तुरीची एकूण आवक 312 क्विंटल ची असून किमान दर 9000 रुपये तर कमाल दर 10441 रुपये प्रति क्विंटल तसेच सर्वसाधारण दर 9920 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

दिनांक.31/01/2024 रोजी जालना बाजार समिती मध्ये पांढऱ्या तुरीची एकूण आवक 2197 क्विंटल ची असून किमान दर 8000 रुपये तर कमाल दर 10799 रुपये तसेच सर्वसाधारण दर 10100 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

व याच जालना बाजार समिती मध्ये लाल तुरीची एकूण आवक 415 क्विंटल ची असून किमान दर 9000 रुपये तर कमाल दर 10412 रुपये तसेच सर्वसाधारण दर 9950 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

दिनांक.01/02/2024 या रोजी जालना बाजार समिती मध्ये पांढऱ्या तुरीची एकूण आवक 1980 क्विंटल ची असून किमान दर 6950 रुपये तर कमाल दर 10755 रुपये तसेच सर्वसाधारण दर 10100 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

व याच दिवसी जालना बाजार समिती मध्ये लाल तुरीची एकूण आवक 584 क्विंटल ची असून किमान दर 8500 रुपये तर कमाल दर 10483 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 9950 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

दिनांक.02/02/2024 रोजी जालना बाजार समिती मध्ये लाल तुरीची एकूण आवक 591 क्विंटल ची असून कमीत कमी दर हा 8300 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 10667 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 10200 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

व याच दिवसी जालना बाजार समिती मध्ये काळ्या तुरीची एकूण आवक 20 क्विंटल ची असून कमीत कमी दर हा 10011 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 10011 रुपये प्रति क्विंटल मिळाला होता.

दिनांक.03/02/2024 रोजी जालना बाजार समिती मध्ये लाल तुरीची एकूण आवक 410 क्विंटल ची असून कमीत कमी दर हा 8400 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 10245 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 10051 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *