2024 यंदा हरभरा बाजार भाव कसे राहतील?

यंदा हरभरा भाव कसे राहतील?

2024 हरभरा बाजार भाव कसे राहतील
या वर्षी हरभरा भाव हमी भावापेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी सांगितले

शेतकरी मित्रांनो राज्यातील बऱ्याच भागात हरभरा पीक काढणी सुरू झालेली आहे. त्यातच राज्यातील एक महत्वाचं कडधान्य पीक असलेले तूर या पिकाची मागणी खूपच वाढली आहे. तुरीला राज्यातील बहुतांश बाजार समिती मध्ये सर्वाधिक भाव 9000 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे यंदा हरभरा बाजार भाव (Harbhara bajar bhav) कसे राहतील त्याच बद्दल आज आपण या पोस्ट च्या मध्येमातून सविस्तर माहिती घेणार आहोत.

वर्ष 2023-24 रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी 5440 रुपये प्रति क्विंटल असा हमी भाव केंद्र सरकारने ठरून दिलेला आहे. त्यातच यंदा देशात जवळपास 7 लाख हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यंदा देशातील हरभरा उत्पादन घटण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

यंदा हरभरा उत्पादनात घट होऊन हरभरा दर हे साधारण हमी भावापेक्षा जास्त राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

त्याच बरोबर या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुक आल्यामुळे साठवण केलेला हरभरा या हरभरा कडधान्याची दाळ करून स्वस्त दरात केंद्र सरकार लोकांना देण्याची भूमिका घेऊ शकते त्यामुळे हरभरा साठा पूर्ण करण्यासाठी हरभरा बाजार भाव साधारण हमी भावापेक्षा जास्त राहतील असा अंदाज आहे.

बोल्ड हरभरा लागवड यावर्षी खूपच कमी झालेली असून या हरभरा कडधान्याची मोठी मागणी बाजारात राहू शकते. त्यामुळे बोल्ड हरभरा भाव साधारण 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दिनांक. 03/02/2024 रोजी चोपडा बाजार समिती मध्ये बोल्ड हरभरा एकूण आवक 300 क्विंटल झाली तर कमीत कमी दर 9500 ते जास्तीत जास्त दर 10375 रुपये प्रति क्विंटल विकला आहे.

याच दिवसी लोकल हरभरा अमरावती बाजार समिती मध्ये कमीत कमी दर 5500 ते जास्तीत जास्त दर 6100 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाली आहे.

जालना बाजार समिती मध्ये लोकल हरभरा हा कमीत कमी 4500 ते 5750 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाली आहे.

नागपूर बाजार समिती मध्ये लोकल हरभरा कमीत कमी दर 5154 ते 5400 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाली आहे.

शेतकरी मित्रांनो यंदा हरभरा लागवड कमी झाल्यामुळे हरभरा हमी भावापेक्षा काहीसा जास्त दराने विक्री होऊ शकतो असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *