कापूस बाजार भाव kapus bajar bhav –
एक वर्षा पूर्वी जानेवारी महिन्यात कापूस दर प्रति क्विंटल सुमारे 8000 रुपय विकला जात होता तोच दर यंदा जानेवारी महिन्यात फक्त 6500 ते 7000 रुपय विकला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता नक्कीच वाढली आहे.
Cotton news: कापूस हे पीक पांढर सोन जरी
असल तरी कापूस भाव मात्र शेतकऱ्यांची चिंता नक्कीच वाढवत आहे, कारण या वर्षी जानेवारी महिन्यात प्रति क्विंटल फक्त 6,500 ते 7,000 रुपय असा भाव मिळत आहे.
हा भाव गेल्या काही वर्षांचा तुलनेने खूप कमी आहे कारण 2 वर्षा पूर्वी कापूस तब्बल 10,000 ते 12,000 रुपय प्रति क्विंटल विकला जात होता तोच कापूस मात्र या वर्षी 6,500 ते 7,000 रुपय विकत आहे.
यंदा जून महिन्यात पावसाचा पडलेला खंड आणि उशिरा झालेली पेरणी कापूस उत्पादन घटीचे प्रमुख कारण आहे तसेच ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसाची क्वालिटी देखील खराब झाली आहे. त्यामुळे या कापसाला मात्र 6,500 रुपय असा भाव मिळाला आहे.
केंद्र सरकारने कापूस पिकासाठी प्रति क्विंटल 7020 रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. तरी या वर्षी मात्र कापसाचा दर 7000 रुपये पेक्षा कमीच आहे.
कापूस उत्पादन कमी होण्याचे प्रमुख कारण –
कापूस उत्पादन कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे अनियमित वातावरणात होणारा बदल तसेच अनेक वर्ष एकाचं पिकाची लागवड करणे होय.
अनेक वर्ष सतत एका जमिनीवर कापूस लागवड होत असल्यामुळे कापूस पिकात बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे व कापूस उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे त्यामुळे पिकाची फेरबदल करणे गरजेचे आहे.
अतिरेक होणार पाऊस व पावसाचा पडलेला खंड हे सुध्दा एक कापूस उत्पादन कमी होण्याचे प्रमुख कारण ठरले आहे.
आजचे कापूस बाजार भाव:-
दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी कापसाला कसे भाव मिळाले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
बाजार समिती- अकोला
जात – लोकल
आवक – 140 क्विंटल
कमीत कमी दर – 6850 रू
सर्वसाधारण दर – 7020 रू
जास्तीत जास्त दर – 7230 रू
बाजार समिती – उमरेड
जात – लोकल
आवक – 928 क्विंटल
कमीत कमी दर – 6500 रू
सर्वसाधारण दर – 6700 रू
जास्तीत जास्त दर – 6900 रू
बाजार समिती – काटोल
जात – लोकल
आवक – 242 क्विंटल
कमीत कमी दर – 6400 रू
सर्वसाधारण दर – 6700 रू
जास्तीत जास्त दर – 6800 रू
बाजार समिती – हिंगणा
आवक – 28 क्विंटल
कमीत कमी दर – 6700 रू
सर्वसाधारण दर – 6800 रू
जास्तीत जास्त दर – 6800 रू
बाजार समिती – वर्धा
जात – मध्येम स्टेपल
कमीत कमी दर – 6550 रू
सर्वसाधारण दर – 6800 रू
जास्तीत जास्त दर – 7020 रू
तर शेतकरी मित्रांनो कापसाला असा भाव मिळत आहे धन्यवाद…