Cotton rate increase; कापसाचे भाव वाढणार! राज्य शासनाचा मोठा निर्णय…
शेतकरी संतापले आजुन कापूस किती दिवस ठेवावा, कापसाचे भाव वाढवा हमी भावापेक्षा कमी कापसाला मिळतोय दर. आमचा केलेला खर्च ही निघेना.
यंदा दुष्काळी परिस्थितीत निर्माण झाल्यामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. फक्त पावसाच्या पाण्यावर घेतलेला कापूस यंदा एकरी 4 ते 5 क्विंटल उत्पादन देत आहे. हे कापसाचे उत्पादन खूपच कमी आसुण यंदा कापसाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च ही निघेना.
यंदा पाऊस कमी, दुष्काळी परिस्थिती, घटलेले कापूस उत्पादक लक्षात घेता कापसाचे भाव हे उच्चांकी पातळीवर पाहिजे होते. पण उलट उत्पादन कमी असूनही यंदा हमी भावापेक्षा ही कमी कापसाला भाव मिळत असून मागील 2 वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर कापसाचे भाव येऊन पडले आहे.
कापूस भाव वाढीसाठी मंत्री मंडळात राज्याचे उमुख्यमंत्री देवंद्रजी फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही दिवसात कापसाचे भाव सुधारतील अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी आणेक दिवसा पासून कापूस साठवण करून ठेवला होता परंतु हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी पॅनिक होऊन मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री करत आहे. याचाच फायदा ज्या शेतकऱ्यांनी आजुन कापूस साठवण करून ठेवला आहे त्यांना काही प्रमाणात कापूस भाव वाढीचा फायदा मार्च पर्यंत दिसून येणार आहे.
यंदा म्हणजे 2023-24 खरीप हंगामासाठी कापला 7020 रुपये प्रति क्विंटल असा हमी भाव ठरून दिलेला आहे. तरी कापसाला फक्त 6000 ते 6600 रुपये असा भाव मिळत असून व्यापारी शेतकऱ्यांनी मोठी लूट करत आहेत. त्यामुळे हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी केल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे. हा घेतलेला निर्णय कापूस भाव वाढीसाठी योग्य निर्णय ठरणार आहे पण जवळपास 70 ते 80 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विक्री केल्यावर हा निर्णय घेतल्यामुळे फक्त 20 टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय लक्षात घेऊन चांगल्या दर्जाचा कापूस जर व्यापारी 7020 रुपये म्हणजे हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांचा विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.