भुईमुग उत्पादन वाढीसाठी कॅल्शियम व सल्फर का महत्वाचे :-
Groundnut farming:- उन्हाळी हंगामात भुईमुग या तेलवर्गिय (Oilseed) पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ज्या भागातील जमीन वाळू मिश्रित (Sandy soil) व हलकी (Light soil) आहे अश्या ठिकाणी भुईमुग लागवड अधिक प्रमाणात केली जाते. भुईमुग हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे तेलवर्गिय पीक असून या पिकामध्ये तेलाचे प्रमाण 45 ते 48 टक्के इतके आहे.
मित्रांनो भुईमुग या पिकास योग्य खत व्यवस्थापन केल्यास उत्कृष्ट उत्पादन मिळू शकते. भुईमुग या पिकास सल्फर (Sulfer) व कॅल्शियम (Calcium) या प्रमुख दोन अन्नद्रव्यांची गरज उत्पादन वाढीच्या दृष्टीने अत्यंत असते. त्यामुळे भुईमुग पिकास हे दोन अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी योग्य खतांचा वापर करणे गरजेचे आहे.
सल्फर का महत्वाचे :- शेतकरी मित्रांनो सल्फर हे एक दुय्यम अन्नद्रव्य असून या अन्नद्रव्यांची गरज तेल वर्गीय पिकासाठी जास्तीत जास्त लागते. त्यामुळे भुईमुग पिकास पेरणी अगोदर किंव्हा पेरणी नंतर सल्फर देणे गरजेचे आहे. सल्फर हे अन्नद्रव्य भुईमुग पिकातील तेलाचे प्रमाण वाढवून उत्पादन वाढीसाठी वरदान ठरणार आहे.
कॅल्शियम का महत्वाचे :- मित्रांनो भुईमुग उत्पादन वाढीसाठी जेवढे सल्फर गरजेचे आहे तेवढेच कॅल्शियम सुध्दा खूप गरजेचे आहे. त्यामुळे भुईमुग पेरणी अगोदर किंव्हा पेरणी नंतर कॅल्शियम देणे सुध्दा खूप गरजेचे आहे. भुईमुग पिकास कॅल्शियम ची कमतरता पडल्यास शेंगतील दाने भरत नाही व शेंग भोंग राहून उत्पादन कमी मिळते.
कॅल्शियम व सल्फर कोणत्या खतातून दयावे :-
भुईमुग पिकास कॅल्शियम व सल्फर देण्यासाठी प्रामुख्याने तुम्ही दोन खतांचा वापर करू शकता.
1- S.S.P दाणेदार:- शेतकरी मित्रांनो दाणेदार हे स्पुरद युक्त खत असून या खतामध्ये प्रामुख्याने तीन अन्नद्रव्य आढळतात. (16 टक्के स्पुरद, 12 टक्के सल्फर व 19 टक्के कॅल्शियम) त्यामुळे भुईमुग पेरणी बरोबर या खताचा वापर केल्यास सल्फर व कॅल्शियम ची गरज भरून निघणार आहे.
2- Gypsum:- म्हणजे (जिप्सम- CaSO4-2H2O) या मध्ये सुध्दा कॅल्शियम व सल्फर चे प्रमाण अधिक असल्यामुळे तुम्ही भुईमुग पेरणी अगोदर एकरी 150 किलो जिप्सम चा वापर जमिनीत मिक्स करून देऊ शकता.