हरभरा घाटे आळी नियंत्रण

हरभरा घाटे आळी एकात्मिक व्यवस्थापन
हरभरा घाटे आळी एकात्मिक व्यवस्थापन
हरभरा घाटे आळी नियंत्रण 

हरभरा घाटे आळी नियंत्रण

हरभरा हे रब्बी हंगामातील एक महत्वाचं कडधान्य पीक आहे, या पिकाची लागवड रब्बी हंगामात सर्वाधिक केली जाते. रब्बी हंगामातील कमी दिवसात व कमी खर्चात अधिक उत्पादन देणार पीक आहे.

बदलत्या वातावरणामुळे हरभरा पिकावर विविध किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो, सध्या राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी मध्येम् व हलका पाऊस पडलेला आहे.

या बदलत्या वातावरणामुळे हरभरा पिकात घाटे आळी (Pod borer) या किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो, ही किड हरभरा पिकातील सर्वात जास्त नुकसान करणारी किड आहे. या किडीचा प्रादुर्भाव हरभरा पिकाच्या घाटे अवस्थेत होत असल्यामुळे ही किड आर्थिक नुकसान जास्त करते. त्यामुळे या किडीचा योग्य वेळी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.

शेतकरी मित्रांनो आज दिनांक 10 जानेवारी 2024 आज राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण झाले आहे तर काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. या बदलत्या वातावरणामुळे नक्कीच हरभरा पिकात मोठ्या प्रमाणात घाटे आळी दिसून येणार आहे. तसेच राज्यात तूर हे सुद्धा एक महत्वाचा कडधान्य पीक आहे या पिकावर सुद्धा या ढगाळ हवामानामुळे आळी मोठ्या प्रमाणात नुकसान करणार आहे.

हरभरा घाटे आळी वळख –

हरभरा घाटे आळी ही हिरव्या रंगाची असून ही आळी सुरुवातीपासूनच हरभरा पिकावर दिसून येते परंतु या आळी चा प्रादुर्भाव फुल व घाटे अवस्थेत ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास दिसून येतो, फुल अवस्थेत जर ढगाळ वातावरण निर्माण झाले तर ही आळी फुल अवस्थेत फुलांच्या पाकळ्या व देठ खाऊन मोठ्या प्रमाणात फुल गळ करते तसेच घाटे अवस्थेत ही आळी घाटे पोखरून दाने खाते व आपल आर्थिक नुकसान करते.

घाटे आळी म्हणजे पॉड बोरर ही आळी प्रामुख्याने हरभरा, तूर, कापूस व टोमॅटो या पिकावर दिसून येते, खरीप हंगामातील कापूस या पिकातील एक महत्वाची किड आहे. हीच आळी कापूस पिकात बोंड आळी म्हणून वळखली जाते. तसेच टोमॅटो पिकात टोमॅटो फ्रूट बोरर म्हणून वाळखली जाते ही आळी टोमॅटो पिकाच्या फळावर छिद्र पाडून टोमॅटो पिकाचे अर्धीक नुकसान करते.

या आळी ने टोमॅटो पिकाच्या फळावर छिद्र केल्यास या फळाला बाजार भाव चांगला मिळत नाही व शेतकऱ्यांची आर्धिक नुकसान पातळी मोठ्या प्रमाणात वाढते व शेतकऱ्यांचा खर्च ही निघणे अवघड होते त्यामुळे या आळी च नियंत्रण योग्य वेळी करणे खूपच गरजेचं आहे.

हरभरा घाटे आळी – (Pod borer)

घाटे आळी ही हरभरा पिकातील पाने व घाटे या भागावर प्रादुर्भाव करते व घट्यातील दाने ही आळी मोठ्या प्रमाणात खाते. ही आळी हरभरा पिकाच्या घट्यावर छिद्र पाडून त्यातील दाने खाते व आपल अर्धिक नुकसान करते.

घाटे आळी ही ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येते, ही आळी नियंत्रण करण्यासाठी जैविक व रासायनिक उपचार करणे खूप गरजेचे आहे.

हरभरा घाटे आळी एकात्मिक व्यवस्थापन –

हरभरा घाटे आळी व्यवस्थापन करण्यासाठी पेरणी अगोदर व पेरणी नंतर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे त्यात.

1- उन्हाळ्यात एक 25 cm खोल नांगरणी करावी, खोल नांगरणी घाटे आळी च नियंत्रण करण्यासाठी खूप गरजेचे आहे.

2- हरभरा फुल व घाटे अवस्थेत साधारण एकरी 25 पक्षी थांबे उभारावे म्हणजे या पक्षी थांब्यावर पक्षी थांबून आळी वेचून खातील. पक्षी थांबे उभारल्या मुळे आपण घाटे आळी व्यवस्थापन 25% झीरो रुपयात करू शकतो.

3- प्रति एकरी साधारण 4 ते 5 कामगंध सापळे उभारावे म्हणजे या आळी चे पतंग या सापळ्यात अडकून व्यवस्थापन करता येईल.

4- 5% निंबोळी अर्क ची फवारणी करावी.

5- आळी ने नुकसान पातळी वलाडल्यास रासायनिक उपचार करावा त्यामध्ये तुम्ही एमामेक्टिन 5% 10 ग्राम प्रति पंप फवारणी करावी.

तर शेतकरी मित्रांनो अश्या पद्धतीने तुम्ही हरभरा पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करू शकता धन्यवाद…

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *