विदर्भ अलर्ट (हवामान अंदाज विदर्भ) – संपूर्ण विदर्भात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचे सावट IMD चा इशारा.
Vidarbha Weather Forecast Today:- काल वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात जोरदार गारपीट झाली असून. या अचानक झालेल्या गारपीट मुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धावपळ झाली आहे. सध्या विदर्भात हरभरा, तूर व गहू काढणीस आलेला असून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अचानक झालेल्या गारपीट मुळे हता तोंडाशी आलेले पीक हिसकावून गेले आहे.
दिनांक – 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान विजेचा गडगडासह विदर्भातील बहुतांश भागात मध्येम व हलका पाऊस होण्याची शक्यता डॉ. के एस होसालिकार यांनी वर्तवली आहे. तसेच विदर्भा लागत असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह हलक्या व मध्येम पावसाचा अंदाज आहे.
आज दिनांक – 11 फेब्रुवारी विदर्भातील जिल्ह्यात मध्येम हलक्या पावसासह काही ठिकाणी गारपीट ची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येणार आहे.
विदर्भातील खालील जिल्ह्यांना येलो अलर्ट :- (Vidarba yellow alert update)
विदर्भातील खालील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून त्यामध्ये प्रामुख्याने वर्धा, देवळी तालुका, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, अकोला, अमरावती, वाशिम व बुलढाणा या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हरभरा काढणी केला असेल तर झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी असा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
मराठवाडा अलर्ट :- (Marathvada Cloudy Alert) – आज दिनांक – 11 पासून 14 फेब्रुवारी पर्यंत मराठवाड्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण तर काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली व छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश आहे.
Unsessional Monsoon Alert:-
शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात अल निनोचा प्रभाव दिसून आला होता त्यामुळे खरीप हंगामात यंदा पाऊस खूप कमी पडला याचाच परिणाम म्हणजे अचानक बदलत्या वातावरणामुळे बेहांगमी पाऊस पडतात आहे. सध्या राज्यातील गारठा कमी झाला असून तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात तपामना वाढल्यामुळे हा पाऊस येत आहे धन्यवाद…