हरभरा उत्पादन घटले पुढील काळात हरभरा भाव चांगले राहण्याची शक्यता?

यंदा हरभरा बाजार भाव 6 हजार रुपये प्रति क्विंटल टिकून राहतील का राहतील तर काय आहेत करणे घ्या समजून…

हरभरा उत्पादन घटले भाव वाढण्याची शक्यता
यंदा हरभरा उत्पादन घटले असून हरभरा बाजार भाव हमी भावापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

हरभरा बाजार भाव पुढील काळात वाढणार का कमी होणार काय म्हणतो हरभरा तज्ञ वाचा सविस्तर माहिती…

हरभरा काढणी झाल्यानंतर सुरुवातीला हरभरा 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला गेला होता परंतु मागील 15 दिवसापासून हरभरा दरात जवळपास 100 ते 200 रुपये प्रति क्विंटल मागे कमी झाले आहे. परंतु तरीही हरभरा पिकास यंदा हमी भावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. हरभरा पिकासाठी 5 हजार 440 रुपये प्रति क्विंटल असा केंद्र सरकारने हमी भाव ठरून दिला असून सध्या बाजारात हरभरा 5600 ते 5700 रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे. काल दिनांक 29 फेब्रुवारी रोजी जालना बाजार समिती मध्ये लोकल हरभरा 5682 रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दराने विकला आहे. तर अकोला बाजार समिती मध्ये लोकल हरभरा 6095 रुपये प्रति क्विंटल एक नंबर क्वालिटी हरभरा विकला गेला आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की पुढील काळात हरभरा भाव वाढतील की पडतील त्याच बद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.

पुढील काळात हरभरा बाजार भाव वाढण्याची दाट शक्यता हरभरा तज्ञ करत आहे कारण यंदा हरभरा लागवड घटली असून उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे. उत्पादन घट आणि मागणी वाढत असेल तर नक्कीच भाव चांगला मिळतो त्यामुळे यंदा पुढील काळात हरभरा बाजार भाव टिकून राहण्याची शक्यता हरभरा तज्ञांनी व्यक्त केली आहे.

यंदा काबुली हरभरा उत्पादन घटले असून काबुली हरभरा भाव देखील चांगले मिळत आहे त्याच बरोबर पुढील काळात म्हणजे लग्न सराईत काबुली हरभरा भाव वाढतील असा अंदाज हरभरा तज्ञ व्यक्त करत आहे. काल दिनांक 29 फेब्रुवारी रोजी अकोला बाजार समिती मध्ये काबुली हरभरा 10000 रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दराने विकला गेला आहे. जळगाव बाजार समिती मध्ये काबुली हरभरा 8 हजार 100 रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दराने विक्री झाली आहे.

मध्ये प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक हे राज्यात हरभरा उत्पादन अधिक घेणारे राज्य असून यंदा देशात जवळपास 6 ते 7 टक्के हरभरा लागवड कमी झाली आहे त्यामुळे उत्पादन ही घटण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला पेरणी झालेला हरभरा बाजारात आला आहे मात्र उशिरा पेरणी झालेला हरभरा फुल किंव्हा घाटे अवस्थेत असून त्या हरभरा पिकास वादळी पाऊस व गारपीट म्हणजे बदलत्या वातावरणामुळे मोठा फटाका बसला आहे त्यामुळे उशिरा पेरणी झालेला हरभरा उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे.

यंदा सुरुवातीपासूनच म्हणजे हरभरा हंगाम सुरू होताच अवकाळी पाऊस तसेच फुल अवस्थेत पाणी टंचाई घाटे अवस्थेत वाढलेले तापमान असे अनेक कारणे यंदा हरभरा उत्पादन कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच हरभरा पिकावर अनेक संकटे आले असून यंदा देशातील हरभरा उत्पादन जवळपास 20 टक्के घटण्याची शक्यता हरभरा तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काळातही हरभरा बाजार भाव हमी भावापेक्षा जास्त राहू शकतात असा अंदाज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *