Panjabrao dakh march 2024 havaman andaj:- राज्यातील गहू, ज्वारी, तूर, हरभरा काढणीस आलेला असून तोंडावर पंजाबराव डख यांनी वर्तवलेला अंदाज 100 टक्के तंतोतंत खरा ठरला आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यानचा हवामान अंदाज खरा ठरला असून राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्ये महाराष्ट्र व कोकणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली पीक जमिनीवर कोसळली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडातील घास या अवकाळी पावसाने हिसकावून घेतला आहे.
पंजाबराव डख हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना तंतोतंत अंदाज देत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पंजाबराव डख काम करत आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात दिनांक 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. परंतु हा पाऊस सर्वदूर नसेल मात्र दिनांक 29 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान राज्यातील नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात दिनांक 29 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मध्ये महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागात जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांचा पाऊस व गारपीट ची मोठी शक्यता आहे.
दिनांक 29 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण दिसून येणार आहे. तर दिनांक 3 मार्च पासून राज्यातील वातावरण कोरडे होणार असून ढगाळ वातावरण वसरणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
मार्च हवामान अंदाज पंजाबराव डख:-
दिनांक 2 मार्च पर्यंत मध्ये महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात जोरदार गारपीट होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर दिनांक 3 मार्च पासून वातावरण कोरडे होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे धन्यवाद…