Cotton rate:- मार्च, एप्रिल व मे महिन्यात कापूस भाव वाढतील की कमी होतील काय म्हणतात कापूस तज्ञ.
मार्च महिन्यात कापूस भाव वाढतील का? कापूस भाव कसे राहतील? कापूस भाव वाढतील तर किती टक्के वाढतील? जाणून घेऊया सविस्तर माहिती..
शेतकरी मित्रांनो 3 ते 4 महिन्यांचा प्रतीक्षेनंतर कापूस दरात मागील 10 दिवसापासून जवळपास 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यातील काही बाजार समिती मध्ये कापसाला 8000 ते 8200 रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर देखील मिळाला आहे. तर काही बाजार समिती मध्ये आजूनही 7200 ते 7500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी कापूस दरात झालेली सुधारणा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दीलासदायक ठरली आहे. कारण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला या ठिकाणी कापसाला सर्वाधिक भाव 8000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त पाहायला मिळाला आहे. देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये सुद्धा कापूस बाजार भाव 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहचला आहे.
गावातील स्थानिक बाजार समिती मध्ये 6500 ते 6800 रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा कापूस आता 7500 ते 7700 रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे. म्हणजे तब्बल कापूस दरात 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ झाली आहे.
जागतिक बाजारात अजूनही कापूस भाव भारतीय बाजार भावापेक्षा 12 टक्के अधिक आहे. त्यामुळे देशात कापूस आयात होण्याची शक्यता कमी आहे कारण जागतिक बाजारात कापूस भाव 12 टक्के अधिक तसेच आयात करायला त्यावर 11 टक्के आयात शुल्क या मुळे जागतिक कापूस देशात आयात करने व्यापाऱ्यांना पोरडणार नाही. त्यामुळेच कापूस देशात आयात होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे.
सध्या राज्यातील बहुतांश बाजार समिती मध्ये लांब धाग्यांचा कपसला 7500 ते 8000 रुपये असा भाव मिळत आहे. तसेच मार्च महिन्यातही हे बाजार भाव टिकून राहण्याची शक्यता अधिक आहे. व्यापाऱ्यांचा अंदाजानुसार मार्च महिन्यात कापूस भावात चढ उतार चालूच राहील.
परंतु बाजारात दिवसेनदिवस कापसाची आवक कमी होत आहे. कारण जवळपास 75 टक्के शेतकऱ्यांनी कापूस हा हमी भावापेक्षा कमी भावाने विक्री केला आहे. सध्या शेतकरी व व्यापारी यांचा कडे 25 टक्के कापूस शिल्लक राहिलेला असल्याची माहिती कापूस व्यापाऱ्यांनी दिली आहे.
मार्च, एप्रिल महिन्यात कापूस आवक कमी झाल्यास कापूस दर आजुन 5 टक्के वाढण्याची शक्यता कापूस तज्ञांनी व्यक्त केली आहे. म्हणजे कापूस दर मार्च अखेर किंव्हा एप्रिल महिन्यात 8500 रुपये प्रति क्विंटल होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे तुमच्याकडे कापसाचा साठा भरपूर असेल तर मार्च, एप्रिल व मे महिन्यात कापूस टप्यात विक्री करने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते.
सूचना:- जागतिक व देशातील कापूस बाजाराचा अभ्यास करून कापूस व्यापारी भाव वाढतील की कमी होतील असा अंदाज देतात परंतु हा अंदाज 100 टक्के खरा ठरतो असे नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्री बाजार पेठेचा आढावा घेऊनच करावी. शक्य तो कापूस विक्री टप्पा टप्यात करणे फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद….