उन्हाळी भुईमूग लागवड 2024 संपूर्ण माहिती:
भुईमुग हे राज्यातील एक महत्वाचं तेलवर्गिय पीक आहे, या पिकाच्या कच्या शेंगला सध्या 7500 ते 8000 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी मिळत आहे. उन्हाळी भुईमूग लागवड करण्यासाठी 15 जानेवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत लागवड कालावधी योग्य आहे. उन्हाळी भुईमूग पिकाची लागवड सुधारित पद्धतीने केल्यास आपण प्रति हेक्टरी चांगले उत्पादन काढू शकतो व भुईमूग पिकाची लागवड सुधारित पद्धतीने होणे गरजेचे आहे.
आज आपण भुईमूग लागवडीपासून तर काढणी पर्यंत संपूर्ण माहिती घेणार आहोत, ही माहिती शेतकरी बांधवांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तरी ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक व सविस्तर वाचा.
भुईमुग उत्पादन वाढीसाठी काही गोष्टी समजून घेऊ
भुईमग हे एक तेलवर्गिय पीक आहे व या पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी कॅल्शियम व गंधक युक्त खतांचा योग्य वापर करणे खूपच गरजेचं आहे.
भुईमूग पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी सुधारित पद्धतीने लागवड करावी व तसेच सुधारित वाणांची निवड करणे खूप गरजेचे आहे.
भुईमुग पिकासाठी कॅल्शियम व गंधक का महत्वाचे:
शेतकरी मित्रांनो कॅल्शियम व गंधक (सुल्फर) हे महत्वाचे दुय्यम अन्नद्रव्य आहेत. या अन्नद्रव्याची गरज भुईमुग उत्पादन वाढीसाठी खूप महत्वाची आहे. कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यामुळे भुईमूग पिकातील शेंगा चांगल्या भरतात तर गंधक या दुय्यम अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यामुळे भुईमूग शेंगातील दान्यात तेलाचे प्रमाण वाढते. कॅल्शियम व गंधक अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी जिप्सम (Gypsum) वापरावे.
भुईमुग पिकासाठी जमीन कशी असावी:-
भुईमुग पिकासाठी जमीन अत्यंत भारी नसावी कारण भारी जमीन असेल तर या जमिनीत भुईमुग उत्पादन कमी मिळते. जमीन मध्येम् हलकी वाळू मिश्रित, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. जमीन वाळू मिश्रित व लाल असेल तर चांगले उत्पादन मिळते कारण या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो व जमिनीत हवा खेळती राहून भुईमूग शेंगांची वाढ चांगली होते.
भुईमुग लागवड पूर्वमशागत:-
भुईमुग या पिकाच्या शेंगा जमिनीत वाढत असल्यामुळे जमीन भुसभुशीत करून घेणे खूप गरजेचे आहे त्यासाठी एक खोल नांगरणी करून घ्यावी व त्यांनतर ती जमीन रोटा करून घ्यावी म्हणजे जाणून भुसभुशीत होईल. एकरी 4 ते 5 टन शेन खत टाकावे म्हणजे जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढेल.
पेरणीची वेळ:-
उन्हाळी भुईमूग पिकाची लागवड 15 जानेवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत केल्यास उत्पादन वाढीसाठी योग्य आहे. कारण या दरम्यान भुईमुग उगवण चांगली होण्यासाठी वातावरण योग्य असते. पेरणी योग्य वेळी करावी पेरणी साठी उशीर झाल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते ही एक गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावी.
उन्हाळी भुईमूग वाणाची निवड:-
जे. एल.- 24 (फुले प्रगती) ही उपट्या प्रकारची जात असून या वाणाची कालावधी 90 ते 95 दिवस आहे म्हणजे खूप कमी कालावधीत येणारा वान आहे. फुले प्रगती हा वान उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी योग्य ठरू शकतो.
टी. जी. 37 ए ही एक उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी चांगला वान आहे. या वाणाची कालावधी 110 ते 120 दिवसाची आहे म्हणजे अधिक कालावधीचा वान आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन 35 क्विंटल इतके आहे व उन्हाळी हंगामासाठी या वाणाची शिफारस केलेली आहे.
टी. पी. जी. 41 हा वान 110 ते 120 दिवसाचा असून या वाणाचे हेक्टरी उत्पादन 35 क्विंटल पर्यंत आहे. या वाणाचे दाने टपोरे असून उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी शिफारस केलेला आहे.
भुईमुग पेरणी अंतर:-
भुईमुग पिकाची पेरणी 30×10 cm किंव्हा 45×10 cm अंतरावर करू शकता. पेरणीसाठी एकरी 45 किलो बियाणे लागणार आहे.
बीज प्रक्रिया:-
भुईमुग बियाणे पेरणी अगोदर बुरशीनाशक बीज प्रक्रिया नक्की करावी त्यासाठी ट्रायकोडर्मा (Trichoderma) जैविक बुरशीनाशक 5 ग्राम प्रति किलो बियाण्यास चोळावे व त्यानंतर पेरणी करावी.
भुईमुग खत व्यवस्थापन:-
भुईमुग खत व्यवस्थापन करण्यासाठी कॅल्शियम व गंधक या दुय्यम अन्नद्रव्याचा अधिक वापर करावा म्हणजे भुईमुग उत्पादन वाढेल. पेरणी अगोदर प्रति एकरी 150 ते 200 किलो जिप्सम (Gypsum) चा वापर करावे म्हणजे कॅल्शियम व गंधक या दुय्यम अन्नद्रव्याचा पुरवठा होईल. प्रति एकरी 10 किलो सल्फर त्याच बरोबर 10 किलो झिंक सल्फेट चा वापर करावा. पेरणी बरोबर बेसल डोस एकरी 3 बाग दाणेदार (SSP) व 1 बॅग 20-20-00-13 खत टाकावे. अश्या पद्धतीने खत व्यवस्थापन केल्यास तुम्ही एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन काढू शकता धन्यवाद.