आज कापसाचे भाव घसरले पाहा आजचे कापूस भाव

कापूस बाजार भावात थोडी घसरण:- Today cotton rate decreased in Maharashtra आज दिनांक 04/03/2024 आजचे कापूस बाजार भाव खाली सविस्तर वाचा..

today kapus bajar bhav
कापूस बाजार भावात थोडी घसरण:- Today cotton rate decreased in Maharashtra आज दिनांक 04/03/2024 आजचे कापूस बाजार भाव खाली सविस्तर वाचा..

आज कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला बाजार समिती मध्ये नंबर वन क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 7900 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. महाराष्ट्र राज्यात कापूस भाव हे मागील काही दिवसात हमी भावापेक्षा जास्त गेले असून सध्या महाराष्ट्र राज्यातील बाजार समिती मध्ये कापसाला सरासरी 6900 रुपये पासून 8000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.

जागतिक बाजारात कापूस साठा कमी आहे त्यामुळे पुढील काळात कापूस बाजार भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे.

शेतकरी मित्रांनो जागतिक आणि भारतीय बाजार पेठेत कापूस दरात काय चढ उतार चालू आहे हे लक्षात घेऊन कापूस विक्री करणे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समिती मध्ये कापसाची आवक कमी होतांना दिसत आहे. जागतिक बाजारात साठी कमी वाढती मागणी लक्षात घेता कापूस बाजार भाव पुढील काळात 5 ते 10 टक्के वाढ होणार असल्याची माहिती कापूस तज्ञांनी दिली आहे.

आज दिनांक 04/03/2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी एक नंबर क्वालिटी कापसाला (सुपर कापूस) जास्तीत जास्त दर हा 7650 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – अमरावती
शेतमाल – कापूस
दिनांक – 04/03/2024
एकूण आवक – 75 क्विंटल
कमीत कमी दर – 7150 रू
सर्वसाधारण दर – 7200 रू
जास्तीत जास्त दर – 7250 रू
अमरावती बाजार समिती मध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला 7250 रुपये भाव मिळाला आहे.

बाजार समिती – देऊळगाव राजा
शेतमाल – कापूस
वान – लोकल
दिनांक – 04/03/2024
एकूण आवक – 800 क्विंटल
कमीत कमी दर – 7000 रू
सर्वसाधारण दर – 7450 रू
जास्तीत जास्त दर – 7730 रू
देऊळगाव राजा एक नंबर क्वालिटी कापूस भाव 7730 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – अकोला
शेतमाल – कापूस
वान – लोकल
दिनांक – 04/03/2024
एकूण आवक – 52 क्विंटल
कमीत कमी दर – 7350 रू
सर्वसाधारण दर – 7450 रू
जास्तीत जास्त दर – 7550 रू
आज अकोला मध्ये एक नंबर क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 7550 रुपये मिळाला आहे.

बाजार समिती – काटोल
शेतमाल – कापूस
वान – लोकल
दिनांक – 04/03/2024
एकूण आवक – 185 क्विंटल
कमीत कमी दर – 6400 रू
सर्वसाधारण दर – 6900 रू
जास्तीत जास्त दर – 7100 रू
आज काटोल बाजार समिती मध्ये भिजलेल्या कापसाला 6400 रुपये तर एक नंबर क्वालिटी कापसाला 7100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *