Milk Machine Buffalo Breed Murrah:- भारत हा जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश आहे. (India highet milk producing country in World). दूध उत्पादनामुळे देशाला मोठा आर्थिक फायदा होता कारण देशातील दूध विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते.
दुधा पासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करून त्यापासून पैसा कमावण्याची चांगली संधी आहे. दुधा पासून तुम्ही बटर, पनीर, कर्ड, लस्सी, मिल्क पावडर, तूप, आइस क्रीम असे अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात.
उन्हाळी हंगामात तर लस्सी, आइस क्रीम या प्रॉडक्ट ला खूप मागणी वाढते त्यामुळे देशातील दूध विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते.
शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दूध उत्पादन करून आर्थिक मदत मिळावी त्यासाठी कोणती मैस सर्वात जास्त दूध देणारी आहे त्या बद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती घेऊ. मित्रांनो दूध उत्पादक व्यवसाय करण्यासाठी योग्य जातींची निवड करणे गरजेचे आहे कारण ज्या मसीच्या दुधात SNF आणि Fat चे प्रमाण अधिक आहे अश्या दुधाला भाव चांगला मिळतो. दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा एकच हेतू असतो की दूध उत्पादन करून दोन पाऊस कमावता आले पाहिजे. त्यामुळे दूध व्यवसाय करण्यासाठी मुऱ्हा ही म्हशीची जात आहे. कारण मुऱ्हा ही जात एक वेतात सरासरी अधिक दूध उत्पादन देते.
भारतातील सर्वात जास्त दूध देणारी मैस:-
देशातील सर्वात जास्त दूध देणारी मैसं मुऱ्हा आहे त्यामुळे या म्हशीला मिल्क मशीन (Milk Machine Buffalo) बोलले जाते. या म्हशीचे उगम स्थान आहे हरियाणा, दिल्ली, पंजाब आहे. मुऱ्हा मैस दिसायला देखणी काळीभोर व चिकणी आहे. मुऱ्हा म्हशीचे शिंग जिलेबी सारखे गोल असून डोक्याचा दिशेने वार वाकलेले असतात.
मुऱ्हा ही देशातील सर्वात जास्त दूध उत्पादन देणारी मैस असून सरासरी एका वेताला 3000 लिटर दूध देते. त्यामुळे दूध व्यवसाय करण्यासाठी ही म्हशीची जात तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे.