Urea and DAP fertilizer buffer stock:- शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय खरीप 2024 हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना युरिया व डी ए पी खत कमी पडू नये त्यासाठी खताचा संरक्षित स्टॉक करून ठेवण्यासाठी राज्य सरकारने दिनांक /15 मार्च 2024 रोजी नवीन GR काढला आहे.
शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात सोयाबीन, तूर, कापूस या सारख्या पिकासाठी युरिया व डी ए पी (DAP) या खताचा वापर पिकासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे खरीप हंगामात युरिया व डी ए पी खताचा साठा कमी असेल तर अनेक दुकानदार शेतकऱ्यांना अधिक भावात खत देऊन फसवणूक करतात त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
सन 2024 खरीप हंगामात युरिया व डी ए पी खत कमी पडू नये त्यासाठी राज्य सरकारने युरिया व डी ए पी खताचा बफर स्टॉक ठेवण्यासाठी दिनांक /15 मार्च 2024 रोजी नवीन GR काढला आहे.
अनेक वेळा खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना युरिया व डी ए पी खताचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नाही त्यामुळे हा खताचा तुडवडा होऊन राज्यातील शेतकऱ्यांची धावपळ होते ही धावपळ होऊ नये त्यासाठी राज्यात युरिया व डी ए पी खताचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय 2024 खरी हंगामासाठी घेतला आहे.
खरीप हंगाम म्हणजे जुन, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात युरिया आणि डी ए पी या दोन खताची मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी खतांची मागणी करतात. त्यामुळे खरीप हंगामात खतांचा तुटवडा होऊन शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांना देण्यासाठी खताचा पुरवठा पाहिजे तेवढा होत नाही. खरीप 2024 हंगामात युरिया आणि डी ए पी खतांचा तुटवडा होऊ नये त्यासाठी आधीच राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
खरीप हंगाम पेरणी जुन महिन्यात सुरू होते आणि खत रेल्वे द्वारे मोठ्या प्रमाणात राज्यात येते परंतु या दरम्यान अवकाळी पाऊस असेल तर रेल्वे द्वारे खत पुरवठा करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होतात त्यामुळे योग्य वेळी खत पुरवठा न झाल्यामुळे खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांची धावपळ होते. तसेच खरीप हंगामात अचानक मोठी मागणी वाढत असल्यामुळे खत उत्पादक कारखान्यांना मुबलक प्रमाणात खतांचा पुरवठा करणे शक्य होत नाही त्यामुळेच राज्य सरकारने युरिया आणि डी ए पी खतांचा बफर स्टॉक केरण्यासाठी निर्णय घेतला आहे.
शेतकरी मित्रांनो दिनांक /11 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत खरीप हंगाम 2024 साठी बफर स्टॉक ठेवण्यासाठी डी ए पी खतांचा संरक्षित साठा करण्यासाठी 0.25 लाख मेट्रिक टन साठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच बरोबर युरिया खताचा संरक्षित साठा करण्यासाठी राज्य सरकारने 11 मार्च 2024 रोजी घेतलेल्या बैठकीत 1.50 लाख मेट्रिक टन संरक्षित साठा करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या खतांचा साठा करण्यासाठी राज्य सरकारने एकूण एकूण 03 नोडल एजन्सी नियुक्त केलेल्या आहेत.