International soyabean market:- जागतिक बाजारात सोयाबीन दरात तब्बल 1.5 महिन्यांनंतर थोडी सुधारणा. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड ने तब्बल 1.5 महिन्यानंतर 12 डॉलर चा टप्पा गाठला आहे. त्यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता सोयाबीन भाव वाढीचा अशा लागली आहे. खरंच देशात सोयाबीन भाव वाढतील का? वाढतील तर किती? पाहा सोयाबीन तज्ञ काय म्हणतात? शेतकरी मित्रांनो सोयाबीन भाव वाढीबाबत खाली माहिती सविस्तर वाचा…
सध्या देशातील सोयाबीन बाजार भाव कसे आहे!
देशातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन साठवण करून ठेवली होती. परंतु सोयाबीन भाव अनेक दिवसा पासून स्थिर आहे. सोयाबीन भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असल्यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
सोयाबीन ला सध्या देशात 4400 रुपये असा सर्वाधिक भाव मिळत असून हा भाव खूपच नीचांकी पातळीवर असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च ही निघेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड चे बाजार भाव काही प्रमाणत वाढल्यामुळे देशातील सोयाबीन भाव कसे राहतील काय म्हणतात सोयाबीन तज्ञ..
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन दर सुधारले असून देशातील सोयाबीन दरात जवळपास 150 ते 200 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ होऊ शकते असा अंदाज सोयाबीन तज्ञांनी केला आहे. ज्या प्रमाणत कापूस दरात अचानक 15 ते 20 दिवसात तब्बल 700 ते 1000 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ झाली अशी वाढ सोयाबीन मध्ये होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सोयाबीन भाव साधारण 200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढण्याची शक्यता सोयाबीन तज्ञांनी केली आहे.
टीप :- सोयाबीन भाव वाढीबाबत हा फक्त अंदाज असून देशातील शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा निर्णय स्वतः घ्यावा धन्यवाद..